विशाखापट्टणम येथील ACA-VDCA स्टेडियमवर होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तरुण डावखुरा खेळाडूला ओपनिंगची संधी मिळेल. यशस्वी जैस्वालने टीम इंडियासाठी केवळ 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यानं केलेल्या शानदार फलंदाजीनं सर्वजण प्रभावित झाले आहेत. यशस्वी जैस्वालमध्ये एकहाती सामना फिरवण्याची ताकद आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा कर्णधार आहे.
advertisement
Rohit Sharma : कोण आहेत दाजी, ज्यांच्याकडे कॅप्टन रोहित शर्मा आपल्या पत्नीसह घेतो एकाग्रतेचे धडे?
T20 सामन्यात ऑस्ट्रेलिया विरूद्ध यशस्वी जैस्वालला संधी मिळणार आहे. जैस्वालनं आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 167.57 च्या स्ट्राइक रेटने 248 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वालने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावलंय. यशस्वी जैस्वाल वेगवान फलंदाजी करण्यात माहीर आहे. हा खेळाडू क्रीझवर येताच मोठ्या गोलंदाजांनाही घाम फुटतो.
यशस्वी जैस्वालने IPL 2023 मध्ये खेळाचं एक उज्ज्वल उदाहरण सादर केलं. यशस्वी जैस्वाल भारताची पुढची स्टार सलामीवीर बनू शकते. यशस्वी जैस्वाल हा देखील डावखुरा फलंदाज आहे आणि असे फलंदाज कोणत्याही संघासाठी सर्वात मोठे एक्स फॅक्टर ठरतात. यशस्वी जैस्वालने IPL 2023 च्या 14 सामन्यांमध्ये 163.61 च्या स्ट्राइक रेटने 625 धावा केल्या आहेत, ज्यात 82 चौकार आणि 26 षटकारांचा समावेश आहे. यशस्वी जैस्वालने IPL 2023 मध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. यशस्वी जैस्वालचा आयपीएल 2023 मधील सर्वोत्तम रन 124 धावा आहे.
भारताचा T20 संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग , प्रसिद्ध कृष्णा , आवेश खान , मुकेश कुमार.