भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांचा आध्यात्मिक शक्ती आणि एकाग्रतेचं सामर्थ्य या दोन्हीवर विश्वास आहे. या दोन्ही बाबी त्यांनी कमलेश पटेल उर्फ दाजी यांच्याकडून अंगीकारल्या आहेत. दाजी हे आध्यात्मिक नेते, लेखक आणि आध्यात्मिक अभ्यासाच्या सहज मार्ग प्रणालीतल्या राज योग गुरूंच्या पंक्तीत चौथे आहेत.
रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांनी हैदराबादमधल्या चेगुर इथल्या त्यांच्या ध्यान केंद्रालाही भेट दिली होती. तिथे दाजी यांनी या दाम्पत्यासाठी 'हार्टफुलनेस मेडिटेशन' हे सत्र आयोजित केलं होतं.
advertisement
“मानवी मन जेव्हा एकाग्र होतं तेव्हा ते काय करू शकतं, याचं रोहित शर्मा हे एक उत्तम उदाहरण आहे. रोहितने आमच्यासोबत ध्यान केलं याचा मला आनंद आहे. यामुळे अनेकांना जीवनाचा मार्ग म्हणून ध्यानाकडे वळण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे,” असं दाजी त्या वेळी म्हणाले होते.
(World Cup 2023 : रोहितच्या 'त्या' चुकीने भारताचा फायनमध्ये पराभव? पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे मत)
कमलेश पटेल उर्फ दाजी हे आध्यात्मिक नेते आहेत आणि श्रीरामचंद्र मिशनचे अध्यक्ष आहेत. ही 1945मध्ये स्थापन झालेली आणि 2014 पासून युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ पब्लिक इन्फॉर्मेशनशी निगडित असलेली ना-नफा तत्त्वावर चालणारी संस्था आहे. दाजी हे लेखकदेखील आहेत. त्यांनी ध्यान आणि अध्यात्म या विषयांवर दोन पुस्तकं लिहिली आहेत.
दाजींचा जन्म 1956 साली गुजरातमध्ये झाला आणि अहमदाबादमध्ये त्यांनी फार्मासिस्टची पदवी घेतली. फार्मसीचे विद्यार्थी असताना, दाजींनी शाहजहानपूरच्या रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली 1976मध्ये राजयोग ध्यानाच्या सहज मार्ग पद्धतीचा सराव सुरू केला.
अहमदाबादच्या एलएम कॉलेज ऑफ फार्मसीमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते न्यूयॉर्कला गेले. तिथे ते पत्नी आणि 2 मुलांसह राहत होते. त्यांनी पदव्युत्तर पदवीदेखील मिळवली आणि त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये औषधनिर्माण व्यवसाय उभा केला.
दाजी यांनी 2003 पासून कोणतंही लाभाचं पद स्वतःकडे ठेवलेलं नाही. आता ते श्री रामचंद्र मिशनसाठी परिश्रमपूर्वक काम करत आहेत. रोहित आणि रितिका यांनी त्यांच्याकडून एकाग्रतेचे धडे गिरवले आहेत.