World Cup 2023 : रोहितच्या 'त्या' चुकीने भारताचा फायनमध्ये पराभव? पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे मत

Last Updated:

World Cup 2023 : वर्ल्‍डकप 2023 च्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 6 गडी राखून पराभूत झाल्याने भारतीय संघाचे चॅम्पियन बनण्याचे स्वप्न भंगले आहे. पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज सलमान बट याने जेतेपदाच्या सामन्यातील ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

रोहित शर्मा
रोहित शर्मा
मुंबई, 21 नोव्हेंबर : वर्ल्‍ड कप 2023 च्या अंतिम फेरीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. रोहित शर्मा ब्रिगेडने संपूर्ण स्पर्धेत त्यांच्या चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. मात्र, एका 'खराब दिवशी' त्यांची कामगिरी अपेक्षेपेक्षाप्रमाणे झाली नाही आणि ऑस्ट्रेलियाकडून (IND vs AUS) 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. जग्गजेता होण्याचे स्वप्न भंगले. पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज सलमान बट याने जेतेपदाच्या सामन्यातील ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. त्याचवेळी भारतीय संघाची चूक कुठे झाली. हेही सांगितले आहे.
बटने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, 'फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया हा वेगळा संघ असल्याचे दिसून आले. त्यांनी भारतीय संघाला श्वास घेऊ दिला नाही. अंतिम फेरीतील त्याचे मैदान वेगळे होते.' पाकिस्तानचा हा माजी क्रिकेटपटू म्हणाला, 'ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी गोलंदाजी करताना चेंडूचा वेग सतत बदलला. त्यांना नियमित विकेट मिळत राहिल्या आणि जुन्या चेंडूवर संघाने फार कमी धावा दिल्या.
advertisement
तो म्हणाला की, नाणेफेकीमुळे भारताने थोडे धैर्य गमावले. मात्र, सुरुवात चांगली झाली आणि रोहित शर्मा आऊट क्लास खेळला. माझ्या मते त्यांच्याकडून चूक होत आहे, ती म्हणजे वर्ल्‍ड कप फायनलसारख्या मोठ्या सामन्यांमध्ये तुम्ही 'पार स्कोअर' पकडला पाहिजे. जेव्हा तुम्ही हा स्कोअर साध्य करता तेव्हा 'किक ऑन' करा. ऑस्ट्रेलियाने भेदक गोलंदाजी केली. रोहित आणि विराट 25 षटके बाकी असताना दोघेही बाद झाले अशी परिस्थिती भारताने कधीच पाहिली नव्हती. अशी परिस्थिती या सामन्यात आली. या सामन्यात रोहित शर्माने स्वतःची विकेट ऑस्ट्रेलियाला दिली तर विराट कोहली दुर्दैवी ठरला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान भारतीय फिरकीपटूंच्या षटकांमध्ये स्लिप न ठेवण्याच्या कर्णधार रोहित शर्माच्या रणनीतीवरही त्याने प्रश्न उपस्थित केले.
advertisement
बट म्हणाला, मला वाटते सूर्यकुमार यादवने फारशी जबाबदारी घेतली नाही. सूर्यकुमार काय करतोय हे मला समजले नाही. तो जेव्हा टेलंडर्ससोबत फलंदाजी करत होता, तेव्हा त्याने स्वतः जास्त चेंडू खेळायला हवे होते. पण मोठे फटके खेळण्याऐवजी तो एकेरी नॉन स्ट्रायकर एंडला जात राहिला. कोहली आऊट झाल्यानंतर भारताला कुठूनही सावरता आले नाही. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान पहिल्या 10-15 षटकांमध्ये भारताला स्विंग मिळाले. त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. तीन गडी बाद झाल्यानंतर भारताला जास्त वेळ विकेट मिळाल्या नाहीत. दव आल्यानंतर फलंदाजी करणे सोपे झाले. रोहित हा सहसा आक्रमक कर्णधार असतो, पण त्याने फिरकीपटूंविरुद्ध स्लिप्स ठेवल्या नाहीत. 240 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी तुम्हाला विकेट्सच घ्याव्या लागणार होत्या. अशात रोहितने स्लिप का घेतली नाही हे समजू शकले नाही? वास्तविक त्या सामन्यात विकेट घेण्याशिवाय विजयासाठी दुसरा मार्ग नव्हता.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
World Cup 2023 : रोहितच्या 'त्या' चुकीने भारताचा फायनमध्ये पराभव? पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे मत
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement