Cricket News : वर्ल्ड कप संपताच अय्यरचा साखरपुडा.... कोण आहे अय्यरची होणारी बायको?

Last Updated:
वर्ल्ड कप 2023 नंतर आता टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर व्यंकटेश अय्यर याचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणाऱ्या या खेळाडूने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करून सर्वांना आनंदाची बातमी दिली.
1/5
टीम इंडियाकडून टी 20 आणि वनडे क्रिकेटमध्ये खेळणारा तर आयपीएलमध्ये केकेआर टीमचा भाग असलेला व्यंकटेश अय्यर याने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

advertisement
2/5
व्यंकटेश अय्यर याने श्रुति रघुनाथन हिच्या सोबत साखरपुडा केला असून त्याला टीम इंडियाचे खेळाडू अर्शदीप सिंह, अवेश खान, मनदीप सिंह, श्रेयस अय्यर, नमन ओझा आणि युजवेंद्र चहल शुभेच्छा दिल्या आहेत. श्रुति रघुनाथन ही एक फॅशन डिझायनर असल्याची माहिती मिळत आहे. तसेच तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून तिला गायनाची देखील आवड आहे असे कळते.

3/5
व्यंकटेश अय्यरने त्याच्या जोडीदारासोबत फोटो शेअर करत लिहिले की, "आयुष्याच्या पुढच्या चेप्‍टरकडे #engaged". साखरपुड्यानंतर व्यंकटेश अय्यर लवकरचं लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती देखील मिळत आहे.

4/5
मध्य प्रदेशातील इंदोर शहरात जन्मलेल्या 28 वर्षीय व्यंकटेशने भारतासाठी दोन वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. वनडे सामन्यात त्याने 24 धावा केल्या आहेत. तर टी 20 क्रिकेटमध्ये भारताकडून त्याने 133 धावा केल्या आहेत.

5/5
आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळताना व्यंकटेश अय्यरने 2023 मध्ये वानखेडे स्टेडियमवर शतक झळकावले होते. यासोबत आयपीएलमध्ये 36 सामन्यांमध्ये त्याने 956 धावा केल्या आहेत.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement