खरं तर चेतेश्वर पुजारा हा गुरुग्राम थंडर्सकडून खेळत होता. या सामन्यात दुबई रॉयल्सने गुरुग्राम थंडर्ससमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुरुग्राम थंडर्सची सूरुवात खूपच खराब झाली होती. कारण फिल मस्टर्ड अवघ्या 7 धावांवर बाद झाला होता.त्याच्यासोबत जरमेन ब्लॅकवुड देखील 8 धावांवर बाद झाला होता.
गुरग्रामचे झटपट दोन विकेट पडल्यानंतर चेतेश्वर पुजाराने संघाचा डाव सावरला होता. त्याच्यासोबत कोलीन डे ग्रॅडहोमने 22 धावांची खेळी केली. त्यानंतर पुजारा आणि कर्णधार थिसारा परेराने वादळी खेळी करायला सूरूवात केली होती. या दरम्यान चेतेश्वर पुजारा तडाखेबाज फलंदाजी करत असताना तो 99 धावांपर्यंत पोहोचला होता.त्याला शतकासाठी एक धाव आणि ग्ररुग्राम संघाला सामना जिंकून देण्यासाठी तीन बॉलमध्ये तीन धावांची आवश्यकता होती. त्यामुळे पुजारा आपलं शतक पूर्ण करून आरामात सामना जिंकवेल असे वाटत होते. पण पियुश चावलाने अख्खी मॅच फिरवली.
दुबई रॉयल्सकडून खेळणाऱ्या पियुश चावलाने चेतेश्वर पुजाराला स्टम्प आऊट केले होते.या स्टम्पिंग आऊटमुळे अख्खी मॅच फिरली होती. कारण या स्पम्पिंग नंतर चेतेश्वर पुजाराचे शकत हुकलं.त्यानंतर गुरुग्राम थंडर्सला तीन बॉलमधअे तीन धावांची आवश्यकता होती.त्यावेळेस चिराग गांधी मैदानात उतरला होता.त्याने चावलाचे दोन बॉल डॉट केले त्यानंतर शेवटच्या बॉलवर गांधी क्लिन बोल्ड झाला होता.जर 56 वर नाबाद असलेल्या थिसारा परेराला संधी मिळाली असती तर सामन्याचा निकाल वेगळा असता.
दरम्यान दुबई रॉयल्सकडून समित पटलने 65 धावांची नाबाद खेळी केली.त्याच्यासोबत अंबाती रायडूने 45 धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर दुबई रॉयल्सने 20 ओव्हरमध्ये 200 धावा केल्या होत्या.
