मॅच संपल्यावरच दुनिथला दिली माहिती
श्रीलंकेने अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर, माजी क्रिकेटर आणि समालोचक रसेल अर्नोल्ड यांनी टीव्हीवर या बातमीला दुजोरा दिला. श्रीलंकेच्या मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेने 170 धावांचा यशस्वी पाठलाग केल्यानंतर थोड्याच वेळात दुनिथला त्याच्या वडिलांच्या निधनाची माहिती देण्यात आली. एका श्रीलंकन पत्रकाराने टीम मॅनेजर दुनिथला धीर देत असलेला एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तो दुनिथच्या खांद्यावर हात ठेवून उभा आहे.
advertisement
दुनिथ वेलालागेचे वडील क्रिकेटर
रसेल अर्नोल्ड यांनी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर बोलताना सांगितले की, "दुनिथ वेलालागेचे वडील सुरंगा यांचे नुकतेच निधन झाले. ते स्वतःही क्रिकेट खेळायचे. आपल्या देशात शालेय क्रिकेट किती मोठे आहे हे तुम्हाला माहीत आहे. मी सेंट पीटर्स कॉलेजचा कर्णधार असताना ते प्रिन्स ऑफ वेल्स कॉलेजचे कर्णधार होते."
नबीने मारले पाच सिक्स
दरम्यान, याच मॅचमध्ये मोहम्मद नबीने शानदार खेळ केला. दुनिथ वेलालागेने त्याला 5 धावांवर असताना जीवदान दिलं. त्यानंतर नबीने तुफान फटकेबाजी केली. त्याने 19 व्या ओव्हरमध्ये 19 धावा काढल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये दुनिथच्या बॉलिंगवर पाच सिक्स मारले. दुनिथच्या त्या ओव्हरमध्ये एकूण 32 धावा गेल्या. टी20 मॅचमध्ये श्रीलंकेच्या बॉलरने एका ओव्हरमध्ये दिलेल्या या दुसऱ्या सर्वाधिक धावा आहेत.