कार्सेने आऊटसाठी अपिल केली अन्...
160 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांना नांग्या टाकल्या पण इंग्लंडच्या बॉलर्सने त्यांना मैदानात टिकू दिलं नाही. ट्रेव्हिस हेड 29 धावा करून आऊट झाला तर जेक वेदरल्ड हा 34 धावांची खेळी करून आऊट झाला. जेव्हा ब्रायडन कार्सेने आऊटसाठी अपिल केली त्यावेळी मोठा वाद झाल्याचं पहायला मिळालं. जेक वेदरल्ड आणि इंग्लंडचा बॉलर ब्रायडन कार्से यांच्यात वाद पेटला.
advertisement
ब्रायडन कार्से संतापला अन् राडा
ब्रायडन कार्से याने एक बॉल टाकला त्यावेळी जेक वेदरल्ड याने बॉल कट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बॉल थेट विकेटकिपरच्या हातात गेला. बॅटला कट लागून देखील जेकला नॉट आऊट घोषित करण्यात आलं. त्यावेळी ब्रायडन कार्से संतापला अन् त्याने राडा घातला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर माघारी
दरम्यान, इंग्लंडने पहिल्या डावात जो रूटच्या शतकाच्या जोरावर 384 धावा उभ्या केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाकडून दोन शतकं साजरी केली गेली. ट्रेव्हिस हेड आणि स्टिव स्मिथ यांनी खणखणीत खेळी करत 567 धावा उभ्या केल्या अन् इंग्लंडला बॅकफूटवर टाकलं. त्यानंतर इंग्लंडला दुसऱ्या डावात हात आखडता घ्यावा लागला अन् इंग्लंडने 342 धावाच दुसऱ्या डावात उभ्या केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात चांगली झाली नाहीये. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले आहेत.
