गौतम गंभीरला राग आला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात संघाच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा राग पुन्हा एकदा स्पष्ट झाला. ऑस्ट्रेलियाने एका रोमांचक सामन्यात भारताचा चार विकेट्सने पराभव केल्यानंतर ही घटना घडली. या पराभवामुळे टी-20 मालिकेत भारताची सुरुवात खराब झाली आणि एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर संघाला आणखी एक मोठा धक्का बसला.
advertisement
टीम इंडियाचे फलंदाज अपयशी ठरले
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या भारताने निराशाजनक कामगिरी केली. फक्त दोन फलंदाज लक्षणीय प्रभाव पाडू शकले. अभिषेक शर्माने 37 चेंडूत 68 धावांची शानदार खेळी केली, तर हर्षित राणाने 35 धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय, इतर कोणताही फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही आणि संपूर्ण संघ 125 धावांवर गुंडाळला गेला. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने त्याच्या चार षटकात फक्त 13 धावा देत तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या काही विकेट गमावल्या, परंतु भारतीय गोलंदाज त्यांना पूर्णपणे रोखू शकले नाहीत. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, परंतु ऑस्ट्रेलियाने 40 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.
गौतम गंभीर भडकला
ऑस्ट्रेलियाच्या सोप्या विजयानंतर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर संतापाने भडकलेले दिसले. ते कर्णधार सूर्यकुमार यादवशी मैदानावर गप्पा मारताना दिसले. मॉर्ने मॉर्केल आणि रायन टेन डोइशेत यांच्यासह इतर संघातील सदस्य देखील उपस्थित होते. गंभीर आपली निराशा व्यक्त करत असल्याचे दिसत होते, तर सूर्यकुमार यादव त्याच ऐकून घेत असल्याचं दिसून आलं.
