TRENDING:

शुभमनच्या नावाला पहिलाच विरोध? रोहितला खेळवताय तर कर्णधार बनवाच, मुंबईच्या दिग्गजाच खळबळजनक वक्तव्य

Last Updated:

शुभमन गिलला कर्णधार बनवल्यानंतर पहिलाच विरोध झाला आहे. तर रोहितला खेळवताय तर कर्णधार बनवा अशी मागणी दिग्गज खेळाडूने केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Harbhajan Singh on Rohit sharma : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. यामध्ये रोहितकडून वनडेच कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे.तर शुभमन गिलला नवा वनडे कर्णधार बनवण्यात आलं आहे.
rohit sharma shubman gill
rohit sharma shubman gill
advertisement

बीसीसीआयच्या या निर्णयावरून अनेक दिग्गज खेळाडूंसह चाहत्यांची नाराजी व्यक्त केली आहे.त्यात आता शुभमन गिलला कर्णधार बनवल्यानंतर पहिलाच विरोध झाला आहे. तर रोहितला खेळवताय तर कर्णधार बनवा अशी मागणी दिग्गज खेळाडूने केली आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा दिग्गज हरभजन सिंगने रोहित शर्माला एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.या वर्षाच्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर तो ऑस्ट्रेलियामध्ये संघाचे नेतृत्व करण्यास पात्र होता. शनिवारी, भारतीय निवडकर्त्यांनी 2027 चा विश्वचषक लक्षात घेऊन युवा कसोटी कर्णधार शुभमन गिलकडे एकदिवसीय कर्णधारपद सोपवले. पण हरभजनला वाटते की रोहित आणखी थोडा काळ कर्णधार राहू शकला असता.

advertisement

हरभजन सिंगने जिओहॉटस्टारला सांगितले,शुभमन गिलचे अभिनंदन. तो निश्चितच कसोटीत संघाचे चांगले नेतृत्व करत आहे आणि आता त्याला आणखी एक जबाबदारी देण्यात आली आहे.रोहितच्या जागी शुभमनला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. रोहित हा पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये खूप चांगला रेकॉर्ड असलेला खेळाडू आहे. रोहित कर्णधार नसताना मला थोडे आश्चर्य वाटते.जर तुम्ही रोहित शर्माची निवड करत असाल तर त्याला कर्णधार बनवा कारण त्याने अलीकडेच तुम्हाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली आहे,असे हरभजनने सांगितले आहे.

advertisement

हरभजन पुढे म्हणाला,रोहित हा भारतीय क्रिकेटच्या पांढऱ्या चेंडूच्या स्वरूपात एक आधारस्तंभ आहे. मला वाटते की त्याला किमान या दौऱ्यात संधी मिळायला हवी होती. जर निवडकर्ते 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाबद्दल विचार करत असतील, तर ते अजून खूप दूर आहे.

शुभमनकडे अजूनही एकदिवसीय कर्णधाराच्या भूमिकेशी जुळवून घेण्यासाठी बराच वेळ आहे. मी शुभमनसाठी आनंदी आहे, त्याला ही संधी मिळाली, पण ती थोडी उशीरा होऊ शकली असती. जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी तो सहा ते आठ महिने किंवा एक वर्ष वाट पाहू शकला असता. मी शुभमनसाठी आनंदी आहे, पण त्याच वेळी रोहित शर्मा कर्णधार नसल्याने मी थोडा निराश असल्याचे शेवटी हरभजन सिंह सांगतो.

advertisement

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ :

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर

advertisement

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

वनडे मालिका 

१९ ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ

२३ ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड

२५ ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी

टी 20 मालिका

२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा

३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न

२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट

६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बंद होणार होती ZP शाळा, आज ठरली जगातली नंबर वन School, पाहावी अशी स्टोरी! Video
सर्व पहा

८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
शुभमनच्या नावाला पहिलाच विरोध? रोहितला खेळवताय तर कर्णधार बनवाच, मुंबईच्या दिग्गजाच खळबळजनक वक्तव्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल