TRENDING:

Harmanpreet Kaur : रोहित सोबत जे घडलं ते हरमनप्रीतसोबत होणार...कर्णधारपद काढून घेतलं जाणार?

Last Updated:

हरमनप्रीत कौरसाठी वाईट बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कप विजयानंतर हरमनप्रीत कौरकडून कॅप्टन्सी काढून घेतली जाणार आहे,अशी माहिती खास सुत्रांकडून समोर येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Harmanpreet Kaur News : टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचत वुमेन्स वर्ल्ड कप जिंकला आहे. या विजयानंतर भारताच्या महिला क्रिकेटपटूंचे आणि कर्णधार हरमनप्रीत कौरचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. या दरम्यान हरमनप्रीत कौरसाठी वाईट बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कप विजयानंतर हरमनप्रीत कौरकडून कॅप्टन्सी काढून घेतली जाणार आहे,अशी माहिती खास सुत्रांकडून समोर येत आहे. पुरुष क्रिकेटमध्ये जसं रोहित सोबत घडलं तसंच हरमनप्रीत सोबत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरमनप्रीत कौरला मोठा धक्का बसला आहे.
harmanpreet kaur
harmanpreet kaur
advertisement

भारताच्या पुरुषांच्या क्रिकेटमध्ये जसे नेतृत्व बदलाचे वारे वाहतात, असेच वारे महिला संघात फिरण्याची शक्यता आहे. कारण भारताची माजी कर्णधार शांता रांगास्वामी यांनी हरमनप्रीत कौरला कर्णधार पद सोडावे असे सुचवले आहे. आणि तिच्या जागी स्मृती मानधनाने जबाबदारी घ्यावी,असे आवाहन केले आहे.त्यामुळेच हरमनप्रीत कौरची कॅप्टन्सी काढुन घेतली जाणार असल्याची चर्चा आहे.

भारतीय क्रिकेटच्या दीर्घकालीन फायद्यासाठी हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडावे. कर्णधारपद सोडल्यानंतर हरमनप्रीत मदत होईल.जी फलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून संघाच्या सर्वात मौल्यवान संपत्तीपैकी एक आहे,असे शांता रंगास्वामी यांनी सांगितले.

advertisement

फलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून हरमन हुशार आहे. पण रणनीतिकदृष्ट्या, ती कधीकधी अडखळू शकते. "जर तिच्यावर कर्णधारपदाचा भार नसेल तर ती अधिक योगदान देऊ शकते असे मला वाटते,असे देखील शांता रंगास्वामी यांनी पीटीआयला सांगितले.

भारताचे भविष्य लक्षात घेऊन हा निर्णय घेतला पाहिजे.कारण 2029 मध्ये होणारा पुढील एकदिवसीय विश्वचषक आणि पुढील वर्षी युकेमध्ये होणारा टी20 विश्वचषक. हा पाहता 29 वर्षीय स्मृती मानधना यांना सर्व फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी द्यावी,असे देखील शांता रंगास्वामी यांनी सुचवले.

advertisement

अशा यशानंतर (वर्ल्ड कप विजयानंतर) जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा ते चांगले घेतले जाणार नाही.परंतु भारतीय क्रिकेटच्या हितासाठी आणि हरमनच्या स्वतःच्या हितासाठी, मला वाटते की ती कर्णधारपदाच्या ओझ्याशिवाय फलंदाज म्हणून बरेच काही योगदान देऊ शकते.तिच्याकडे अजूनही तीन-चार वर्षे मोठे क्रिकेट खेळणे बाकी आहे. कर्णधार नसल्यामुळे ती ते करू शकेल. तसेच स्मृतीला सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार बनवले पाहिजे. तुम्हाला भविष्यातील विश्वचषकांसाठी देखील नियोजन करावे लागेल,असे शांता रंगास्वामी यांनी सांगितले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडण्याचं धाडस केलं अन् सुरू केलं केक शॉप, आज मनाली वर्षाला कमावते 24 लाख!
सर्व पहा

जर असे झाल्यास ज्याप्रमाणे रोहित शर्माकडून वनडेच कर्णधार पद काढून घेतलं गेलं,त्याप्रमाणे हरमनप्रीत कौरकडून देखील कर्णधार पद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Harmanpreet Kaur : रोहित सोबत जे घडलं ते हरमनप्रीतसोबत होणार...कर्णधारपद काढून घेतलं जाणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल