काय म्हणाला हर्षित राणा?
एक गोष्ट लक्षात घ्या, जर मी या सर्व गोष्टी ऐकत बसलो आणि डोक्यात याच गोष्टी लक्षात ठेऊन मैदानात उतरलो तर मला वाटत नाही की, मी क्रिकेट खेळू शकेल. म्हणून मी जेवढं शक्य आहे, तेवढं अशा गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो. मला मैदानावर काय करायचंय? याची मला क्लियारिटी असते. त्यामुळे मी मॅचमध्ये त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो, असं हर्षित पत्रकार परिषदेत म्हणाला.
advertisement
रोहित अन् विराटचं कौतूक
स्टेडियमच्या बाहेर किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काय चाललंय किंवा कुणी काय बोलतंय, याने मला आता फरक पडत नाही. मी फक्त कठोर परिश्रमाने माझं काम करतो आणि माझ्या रणनितीवर काम करतो, असं हर्षित राणा म्हणाला आहे. हर्षितने यावेळी रोहित अन् विराटचं देखील कौतूक केलं. दोघांमुळे आता क्रिकेट वेगळ्या उंचीवर आहे आणि टीम इंडियाचं वातावरण दोघांमुळे चांगलं राहतं, असंही हर्षित राणा म्हणाला.
गंभीर काय म्हणाला होता?
दरम्यान, गौतम गंभीरने याआधी हर्षित राणाच्या ट्रोलिंगवर कमेंट केली होती. त्यांना लाज वाटली पाहिजे की, तुम्ही 23 वर्षांच्या एका तरुण खेळाडूला टार्गेट करत आहात. हर्षितचे वडील कुठलेतरी निवडकर्ता किंवा माजी चेअरमन नाहीये. त्याने आपल्या क्षमतेवर टीम इंडियात स्थान मिळवले आहे." गंभीर यांनी असेही सांगितले की, टीका करायची असेल तर माझ्यावर करा, पण युवा खेळाडूवर वैयक्तिक हल्ला करणे चुकीचे आहे. त्यांनी 'युट्यूब चॅनेल' चालवण्यासाठी असे नको ते उद्योग करू नका, असं गंभीरने सुनावलं होतं.
