हसीन जहाँ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मोहम्मद शमी आणि ती नात्यात पती-पत्नी आहेत. परंतु, दोघेही अनेक वर्षांपासून विभक्त आहेत. दोघांनाही एक मुलगी आहे, जी हसीन जहाँसोबत राहते. सोशल मीडियावर तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून लोक म्हणत आहेत की हसीन जहाँने तिच्या पतीला हातवारे करून सांगितले की, 'मैं तेरी दुश्मन...'
advertisement
मॉडेल आणि अभिनेत्री हसीन जहाँ सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून लोकांचे मनोरंजन करते. अलीकडेच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून सोशल मीडिया युजर्स म्हणतायेत की हे इशारे फक्त मोहम्मद शमीसाठी आहे.
हसीन जहाँने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती लता मंगेशकर यांनी गायलेल्या 'मैं तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा' या हिट गाण्यावर एक्सप्रेशन देताना दिसत आहे. अभिनेत्री म्हणते, 'सबकी जुबा पर मेरी कहानी… मेरा डसा हुआ मांगे ना पानी. तेरी तमाशा सब देखेंगे, क्या होता है अब देखेंगे. देखा न तू कल का सवेरा मैं नागिन तू सपेरा.’
हसीन जहाँच्या या व्हिडिओवर कमेंटचा पाऊस पडत आहे. कोणी तिला नागिन म्हणतंय तर कोणी सांगतंय की हे गाणं फक्त तुझ्यासाठी बनलं आहे. एका यूजरने लिहिले - 'डंख तर मारलाय शमीभाऊला…’, आणखी एकाने लिहिलंय ‘आता कुणाला डंख मारायचाय मॅडम’… एकाने तर लिहिलंय ‘नागमणी घेऊनच थांबेल’.
नाग-नागिनवर आधारित 'नगीना' हा चित्रपट 1986 साली प्रदर्शित झाला होता. 'नगीना' चित्रपटात श्रीदेवीचा नायक होता ऋषी कपूर आणि खलनायक अमरीश पुरी. या चित्रपटातील त्यांचं नागिन नृत्य आहे, ज्याचे बोल आहेत – ‘मैं तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा..मैं नागिन तू सपेरा’ आजही खूप प्रसिद्ध आहे. या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले होते.