अभिषेक शर्माने 18 बॉलमध्ये 194.44 च्या स्ट्राईक रेटने 35 रन केले, ज्यात 3 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता, पण अभिषेक आऊट झाल्यानंतर टीम इंडियाचा खेळ सावध झाला. शुभमन गिलने 28 बॉलमध्ये 28 तर सूर्यकुमार यादवने 11 बॉलमध्ये 12 रन केले. मागच्या काळापासून शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव संर्घष करत आहेत. सूर्यकुमार यादवचं मागच्या 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फक्त एक अर्धशतक आहे, तर गिलला 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकही अर्धशतक करता आलेलं नाही.
advertisement
तर जितेश शर्मा, शिवम दुबे आणि अक्षर पटेल या खेळाडूंनाही मागच्या काही सामन्यांमध्ये धमाकेदार खेळी करता आलेली नाही. या सामन्यात अक्षर पटेल तब्येत बरी नसल्यामुळे खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही टी-20 सीरिजमध्ये अभिषेक शर्माच्या आक्रमक बॅटिंगच्या जोरावर टीम इंडियाने सीरिज जिंकली आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आघाडी घेतली, पण अभिषेक शर्माच्या बॅटिंगच्या जोरावर टीममधल्या गिल, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, शिवम दुबे आणि जितेश शर्मा यांची कामगिरी लपत आहे.
भारतामध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, त्याआधी टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 आणि न्यूझीलंडविरुद्ध 5 अशा एकूण 7 मॅच आहेत. या 7 सामन्यांमध्ये भारतीय बॅटिंगला सूर सापडणं गरेजचं आहे, अन्यथा टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.
