अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज लोकसभेत बजेट सादर केला. अर्थसंकल्पातून यावेळी सर्वसामान्य लोकांना आयकरात मोठा दिलासा मिळलाा. मात्र जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड त्याच्या उत्पन्नावर किती कर देत असेल याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? बीसीसीआयच्या उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत आणि ते कुठे आणि कसा खर्च करतात?
बीसीसीआयची कमाई आणि कर
advertisement
साल 2023-24 मध्ये बीसीसीआयने एकूण 18,700 कोटी रुपयांची कमाई केली. त्याच कालावधीत 4,298 कोटी रुपयांचा कर भरला. 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षांसाठी बीसीसीआयने 2,038 कोटी रुपये जीएसटी (GST) स्वरूपात भरले.
बीसीसीआय इनकम टॅक्स अॅक्ट 1961 च्या कलम 11 अंतर्गत केंद्र सरकारकडून कर सूट मिळवण्याचा दावा करत आहे. मात्र, कर विभागाने बीसीसीआयला सूट देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. सध्या हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. कलम 11 धार्मिक हेतूंसाठी ठेवलेल्या संपत्तीवर मिळणाऱ्या उत्पन्नावर कर सूट देते.
बीसीसीआयने किती जीएसटी भरला?
बीसीसीआय ही स्वायत्त संस्था आहे. जी तामिळनाडू सोसायटी रजिस्ट्रेशन अॅक्ट 1975 अंतर्गत नोंदणीकृत आहे. गेल्या वर्षी संसदेत वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले होते की, IPL सारख्या खेळ स्पर्धांमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा आणि हक्कांवर बीसीसीआयला 28% जीएसटी लागू होतो.
2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षांत बीसीसीआयकडून सरकारला 2,038.55 कोटी रुपयांचा जीएसटी प्राप्त झाला. विशेष म्हणजे बीसीसीआय केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान घेत नाही.
बीसीसीआयची कमाई कशी होते?
IPL आणि भारतीय क्रिकेट सामन्यांचे प्रसारण हक्क विकून मोठी कमाई
टायटल स्पॉन्सरशिप आणि भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवरील जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न
स्टेडियममधील जाहिराती आणि तिकीट विक्रीतून मिळणारा महसूल
बीसीसीआयचा खर्च कुठे होतो?
राज्य क्रिकेट संघटनांच्या विकासासाठी आर्थिक मदत
भारतीय क्रिकेटपटूंच्या पगार आणि कराराच्या रकमेसाठी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) वार्षिक शुल्क भरण्यासाठी
क्रिकेटशी संबंधित नवीन प्रकल्प आणि तंत्रज्ञान विकासासाठी
