पॅट कमिन्सला का वगळण्यात आले?
पॅट कमिन्स सध्या कमरेच्या हाडाच्या दुखापतीतून बरा होत आहे. ही दुखापत त्याला 2025-26 च्या अॅशेस मालिकेपूर्वी समोर आली होती, ज्यामुळे तो पाचपैकी चार कसोटी सामने खेळू शकला नाही. जरी त्याने अॅशेस दरम्यान रिहॅब केले आणि अॅडलेड कसोटीत सहा विकेट्स घेतल्या तरीही तो पूर्णपणे बरा होण्यासाठी अजूनही वेळ घेत आहे, ज्यामुळे त्याला वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकावे लागले.
advertisement
जॉर्ज बेली यांनी पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतून पॅट कमिन्स, जॉश हेझलवुड आणि टीम डेव्हिड यांना वगळण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की टीम डेव्हिडला किरकोळ हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला होता पण आता तो फिट होण्याच्या मार्गावर आहे. जॉश हेझलवूडचीही प्रकृती तशीच आहे. पॅट कमिन्सला फिट व्हायला वेळ लागेल. तो वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाही. कमिन्स तिसऱ्या किंवा चौथ्या सामन्याच्या आसपास टीममध्ये सामील होऊ शकतो, असं जॉर्ज बेलीने सांगितलं आहे.
ऑस्ट्रेलिया घाई करणार नाही
ऑस्ट्रेलियन टीम मॅनेजमेंट पॅट कमिन्सबाबत काहीही घाई करू इच्छित नाही. कमिन्सला पाठीच्या दुखापतीचा इतिहास आहे, म्हणून निवड समितीने त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी पुरेसा वेळ द्यायचा आहे. जॉर्ज बेली म्हणाले की, कमिन्सने कोणताही धोका न घेता टीममध्ये परतावे अशी आमची इच्छा आहे. फण, आवश्यक असल्यास योजना बदलल्या जाऊ शकतात.
टीमच्या संतुलनावर परिणाम
पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवर परिणाम होऊ शकतो, विशेषतः सुरुवातीच्या सामन्यांमध्ये. आता कमिन्स पूर्णपणे फिट होईपर्यंत आणि मैदानात परत येईपर्यंत इतर फास्ट बॉलर जबाबदारी कशी हाताळतात यावर टीम मॅनेजमेंटचं लक्ष असेल.
