2006 साली पदार्पण केलेल्या या खेळाडूने 24 टेस्ट, 164 वनडे आणि 85 टी-20 मॅच खेळल्या. यात त्याने टेस्टमध्ये 45 च्या सरासरीने 1946 रन, वनडेमध्ये 37.53 च्या सरासरीने 5,217 रन आणि टी-20मध्ये 23.75 ची सरासरी आणि 128.29 च्या स्ट्राईक रेटने 1805 रन केले. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 14 शतकं आहेत. याशिवाय त्याने टेस्टमध्ये 26, वनडेमध्ये 86 आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 49 विकेट घेतल्या.
advertisement
क्रिकेटपटूची धक्कादायक कबुली
झिम्बाब्वेचा दिग्गज क्रिकेटपटू सिन विलियम्स हा ऍन्टी डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे, त्यानंतर त्याने आपण ड्रग्जच्या आहारी गेल्याचं मान्य केलं आहे. विलियम्सचं कॉन्ट्रॅक्ट 31 डिसेंबर 2025 ला संपणार आहे, यानंतर झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड त्याचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करणार नाही. सिन विलियम्सने झिम्बाब्वेकडून 24 टेस्ट, 164 वनडे आणि 85 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या, ज्यात त्याने 8,968 रन करून 161 विकेटही घेतल्या. या ऑलराऊंड कामगिरीमुळे विलियम्स झिम्बाब्वेच्या दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक बनला.
सिन विलियम्सने आयसीसी टी-20 वर्ल्ड कप आफ्रिका क्वालिफायर स्पर्धेआधी माघार घेतली होती. हरारेमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. विलियम्सने स्वेच्छेने पुनर्वसन केंद्रात जायचा निर्णय घेतल्याचं झिम्बाब्वेने स्पष्ट केलं आहे. 39 वर्षांच्या सिन विलियम्सने संभाव्य अँटी-डोपिंग टेस्टच्या भीतीमुळे स्वतःला अनुपलब्ध केलं होतं, त्यानंतर अंतर्गत चौकशीदरम्यान तो ड्रग्जच्या आहारी गेल्याचं उघड झालं.
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड सर्व करारबद्ध खेळाडूंकडून शिस्त तसंच टीम प्रोटोकॉल आणि अँटी-डोपिंग नियमांचे पालन करण्याची अपेक्षा करतं, असं बोर्डाने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. तसंच यापुढेही कधीही सिन विलियम्सची निवड होणार नाही, असंही बोर्डाने स्पष्ट केलं आहे.
बोर्डाकडून सिन विलियम्सला शुभेच्छा
सिन विलियम्सच्या मागच्या दोन दशकांमधल्या योगदानाबद्दल बोर्डाने त्याचे आभार मानले आहेत. सिन विलियम्सने झिम्बाब्वेच्या क्रिकेट इतिहासातील महत्त्वाच्या क्षणांमध्ये योगदान दिलं, त्याबद्दल त्याचे आभार, असंही झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे.
