मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी यावर प्रतिक्रिया देताना संघात मोठे बदल करण्यास नकार दिला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, अनुभवी खेळाडूंवर विश्वास कायम ठेवत त्यांना चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहित केले जाईल.
सोमवारी मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून 12 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर जयवर्धने यांना पुढील सामन्यांमध्ये प्लेइग इलेव्हनमध्ये बदल करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी उत्तर दिलं, खरं तर नाही. निकाल आमच्या बाजूने गेले नाहीत. पण तरीही आम्ही काही चांगली क्रिकेट खेळलो आहोत.
advertisement
पाठिंबा देणार
जयवर्धने म्हणाले, मी अजूनही सीनियर खेळाडूंना संघात ठेवण्याच्या बाजूने आहे. जे खेळाडू आमच्या विश्वासावर उतरले आहेत. त्यांच्या क्षमतेवर आमचा विश्वास आहे. पण आता थोडं अधिक जबाबदार व्हावे लागेल.
लगेच संधी देणं धोकादायक
संघ सध्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. मात्र तरीही जयवर्धने यांनी संघात नवख्या चेहऱ्यांना घेणं हाच उपाय नाही, असं सांगितलं. पराभूत होणे हे कधीच चांगलं नसतं. त्यातून आत्मविश्वास ढासळतो. अशा अवस्थेत अनुभव नसलेल्या खेळाडूंना संघात घेणं त्यांच्या दृष्टीने अधिक कठीण ठरू शकतं.
अनुभवच सावरतो
जे खेळाडू अनुभवी आहेत, त्यांना अशा परिस्थिती हाताळण्याची सवय आहे. ते मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत असतात आणि यावरच आमचा भर राहणार आहे, असंही जयवर्धने यांनी ठामपणे सांगितलं.