पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी
या वादाची सुरुवात 14 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचनंतर झाली. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय टीमने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. या घटनेनंतर, PCB ने टूर्नामेंटमधून बाहेर पडण्याची आणि पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली. मात्र, ICC ने PCB ची ही मागणी फेटाळून लावली. या निषेधार्थ, पाकिस्तानची टीम UAE विरुद्धच्या मॅचसाठी स्टेडियमवर एक तास उशिरा पोहोचली, ज्यामुळे अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचं पहायला मिळालं होतं.
advertisement
लपूनछपून व्हिडीओ काढला
PTI च्या एका रिपोर्टनुसार, ICC चे सीईओ संजोग गुप्ता यांनी PCB ला एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट केलं आहे की, मॅचच्या दिवशी खेळाडू आणि मॅच अधिकाऱ्यांच्या परिसरात (PMOA) वारंवार नियमांचे उल्लंघन होत आहे आणि याला PCB जबाबदार आहे. पाकिस्तानने यावेळी लपूनछपून व्हिडीओ काढल्याचं देखील समोर आलं आहे.
बैठकांपासून मीडिया मॅनेजरने दूर राहावं
दरम्यान, पाकिस्तानच्या मीडिया मॅनेजर नईम गिलानी यांच्या एका कृतीमुळेही ICC नाराज आहे. त्यांनी मॅच रेफरी पायक्रॉफ्ट, पाकिस्तानचे मुख्य कोच माईक हेसन आणि कर्णधार सलमान अली आगा यांच्यातील टॉसपूर्वीची बैठक शूट केली, जे नियमांचे उल्लंघन आहे. अशा बैठकांपासून मीडिया मॅनेजरने दूर राहावे, असे ICC ने स्पष्ट केले होते. त्यामुळे दोन्ही बोर्डातील संबंध ताणले गेले आहेत.