कोल्हापूर : पाकिस्तान विरुद्ध झालेल्या ऐतिहासिक लढतीत भारताने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर कोल्हापूरमध्ये नादखुळा जल्लोष पाहायला मिळाला. पाकिस्तान विरोधात विजयाची चाहूल लागताच कोल्हापूरकर छत्रपती शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणावर एकत्र आले. हातात तिरंगा आणि भगवा ध्वज, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. या जल्लोषात युवक आणि महिलांचा देखील उत्साह दिसत होता.
advertisement
भारताचा छावा विराट कोहलीच !
विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरूद्ध 6 विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठ्या जल्लोषाचे वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी लोकल 18 ने कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी लोकल 18 शी बोलताना एका चिमुकल्याने कोल्हापुरी भाषेत आपला आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांन कोल्हापुरी भाषेत एका वाक्यात उत्तर दिलं. विराट कोहली भारताचा छावा आहे. त्यानं भारताला जिंकून दिलं असं तो म्हणला.
नोकरी सोडली, सुरु केला टीशर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय, नाशिकच्या तरुणाची बक्कळ कमाई
सामना पाहण्यासाठी थेट कोल्हापूर गाठलं
“भारताचा विजय निश्चित होता. त्यामुळे आम्ही छत्रपती शिवाजी चौकात येऊन जल्लोषाची आधीच तयारी केली होती. आम्ही फक्त वाट पाहात होतो. विजय नेमका कसा होणार? पण विराट कोहली खेळला आणि विषय संपला. भारतानं दणदणीत विजय मिळवला याचा आनंद आहे,” असं एक चाहता म्हणाला. तर आम्ही भारत पाकिस्तान मॅच पाहण्यासाठी पुण्याहून कोल्हापुरात आहे. आम्ही मूळचे कोल्हापूरचे असल्याने भारत-पाकिस्तान मॅच पाहण्याची आणि जल्लोषाची मजा कोल्हापुरात असते. आता भारतानं मॅच जिंकल्यावर आमचा जल्लोष सुरू आहे,” असंही एका चाहत्यानं सांगितलं.
विराट कोहलीने 111 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 100 धावा करत आपले 51 वे वनडे शतक पूर्ण केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पुन्हा एकदा 242 धावांचे लक्ष्य कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण केले. विराट कोहलीने जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावले आणि भारताचा विजय निश्चित केला. कोहलीने विजयी चौकार लगावत शतकही पूर्ण केले. यामुळे टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत धडक दिली आहे.