Sanju Samson : 'आजकाल कॅमेऱ्याचा भरोसाच नाहीये...', व्हायरल फोटोवर संजूने सांगितला केरळच्या मित्रांचा किस्सा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sanju Samson On Viral Photo spotted in a local tea shop : आजकाल कॅमेऱ्याच्या भरोसाच नाहीये, कुठंही फोटो येतात, असं म्हणत संजू सॅमसनने अभिषेककडे हसून प्रतिक्रिया दिली.
Sanju Samson On Viral Photo : तुझे टीम मेट्स वर्ल्ड कप जिंकल्यानंतर परदेशी फिरायला जातात. तू एका रोडच्या बाजूला बसून चहा पीत बसतो. संजू सॅमसन असाच आहे का? असा सवाल संजूला एका कार्यक्रमात विचारला गेला. त्यावर संजूने मजेशीर उत्तर दिलं. आम्ही पण बाहेर जाण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपलब्ध नव्हतं, असं संजू सॅमसन म्हणाला. त्यावेळी त्याने व्हायरल झालेल्या फोटोचा किस्सा सांगितला.
आम्ही गाडी काढली अन् कालीकतपर्यंत...
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मी पहिली गोष्ट केली की, मी माझ्या आईवडिलांना भेटायला गेलो, ते त्रिवेंद्रममध्ये राहतात. तिथून आम्ही गाडी काढली अन् कालीकतपर्यंत जे मित्र दिसतील, त्यांना उचलून घेऊन गेलो. ज्यांच्यासोबत मी लहानपणापासून क्रिकेट खेळतो, असे माझे जवळचे मित्र आहेत.
ये भाई चाय पिऊन जाऊ...
advertisement
आम्ही जाताना जे कोणी मित्र होते, त्यांना फोन करून बोलवत होतो, ये भाई चाय पिऊन जाऊ, असं म्हणत आम्ही भेटलो, असं संजून सांगितलं. आजकाल कॅमेऱ्याच्या भरोसाच नाहीये, कुठंही फोटो येतात, असं म्हणत संजू सॅमसनने अभिषेककडे हसून प्रतिक्रिया दिली. मला जवळच्या मित्रांसोबत फिरायला आवडतं. हा फोटो त्यावेळी कुणीतरी काढला असावा, असं संजूने सांगितलं.
advertisement
संजू सॅमसन केरळचा असला तरी...
कार्यक्रमादरम्यान अभिषेक शर्माने संजूबद्दल एक मनोरंजक गोष्ट सांगितली. त्याने स्पष्ट केले की संजू सॅमसन केरळचा असला तरी तो अस्खलितपणे पंजाबी बोलतो आणि पंजाबी गाणी ऐकायला आवडतो. त्याने पुढे सांगितले की ते सामन्यांदरम्यान अनेकदा पंजाबीमध्ये बोलतात.
advertisement
वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना...
दरम्यान, जेव्हा संजूला त्याच्या चाहत्यांबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्याने हा मनोरंजक किस्सा सांगितला. त्याला विचारण्यात आलं की, जेव्हा तो संघासोबत असतो तेव्हा त्याला त्याचे चाहते त्याला सर्वत्र पाठिंबा देताना दिसतात. यावर उत्तर देताना संजू म्हणाला की एकदा तो वेस्ट इंडिज दौऱ्यावर होता. तो फलंदाजीसाठी येत असताना अचानक इंग्रजी गाणं बदललं आणि एक मल्याळम गाणं वाजू लागलं. संजू म्हणाला की त्याला या घटनेने धक्का बसला होता, पण चाहते त्याला पाठिंबा देतात आणि त्याच्यावर खूप प्रेम करतात हे खरं आहे, असं संजूने यावेळी म्हटलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 11:06 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sanju Samson : 'आजकाल कॅमेऱ्याचा भरोसाच नाहीये...', व्हायरल फोटोवर संजूने सांगितला केरळच्या मित्रांचा किस्सा!








