IND vs PAK मॅचला ऍन्डी पायक्रॉफ्ट रेफरी
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या मॅचनंतर निर्माण झालेल्या वादामुळे चर्चेत आलेले पंच ऍन्डी पायक्रॉफ्ट हे पुन्हा एकदा याच दोन संघांच्या मॅचसाठी रेफरी म्हणून काम पाहणार आहेत. वादाच्या पार्श्वभूमीवर, आयसीसीने (ICC) पाकिस्तानची ऍन्डी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी फेटाळली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या आगामी दोन्ही सामन्यात ऍन्डी पायक्रॉफ्ट हेच रेफरी असतील. भारत आणि पाकिस्तानच्या मॅचमध्ये देखील ऍन्डी पायक्रॉफ्ट यांना संधी दिली गेली आहे.
advertisement
जय शहा यांची चर्चा
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आरोप केला होता की, पायक्रॉफ्ट यांनी भारत-पाकिस्तान मॅचमध्ये खेळाडूंना हँडशेक करण्यास मनाई केली होती. मात्र, आयसीसीने पाकिस्तानचा हा आरोप फेटाळून लावला आहे. पायक्रॉफ्ट हे पाकिस्तान आणि बांगलादेश मॅचमध्ये देखील रेफरीची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र जय शहा यांची चर्चा होताना दिसत आहे.
आयसीसीचं पाकिस्तानला उत्तर
दरम्यान, हँडशेक वादामध्ये मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांची भूमिका नाही, त्यामुळे एका सदस्याच्या मागणीवरून मॅच रेफरीची उचलबांगडी करणं योग्य नाही, तसंच हे चुकीचं उदाहरण ठरेल, असं आयसीसीने म्हटलं होतं. दुसरीकडे पीसीबीने आयसीसीला लिहिलेल्या पत्रात भारतीय खेळाडूंवरही नाराजी व्यक्त केली आहे, पण एमसीसीच्या नियमांनुसार मॅचआधी किंवा मॅचनंतर खेळाडूंनी हस्तांदोलन करणं हा नियम नाही, त्यामुळे पाकिस्तानची मागणी फेटाळून लावल्याची देखील माहिती समोर आली होती.