अंडर १९ वर्ल्ड कप १९८८ पासून खेळला जातो. आतापर्यंत १४ वेळा ही स्पर्दा झाली. यात भारतीय संघाने सर्वाधिक ५ विजेतेपदं पटकावली आहेत. स्पर्धेतील शेवटचा हंगाम २०२२ मध्ये वेस्टइंडिजमध्ये खेळला होता. तेव्हा फायनलमध्ये भारताने इंग्लंडला ४ गडी राखून नमवलं होतं.
advertisement
क्रिकबझने दिलेल्या रिपोर्टनुसार, श्रीलंका बोर्डात सुरु असलेल्या गोंधळामुळे आयसीसीने अंडर १९ वर्ल्ड कपचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला. तसंच १० नोव्हेंबरला श्रीलंका क्रिकेट बोर्डाला निलंबित कऱण्याचा घेतलेला निर्णय कायम ठेवला आहे. निलंबनाची कारवाई झाली असली तरी खेळावर परिणाम होणार नाही. श्रीलंकेचा संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळेल. निलंबित बोर्डाकडून कामकाज पाहिलं जाईल.
अंडर १९ वर्ल्ड कप १४ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत खेळवला जाणार आहे..तर दक्षिण आफ्रिकेत टी२० लीगचे दुसऱ्या हंगामातील सामनेसुद्धा १० ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या बोर्ड अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वर्ल्ड कप आणि टी२० लीगचे सामने ठरलेल्या शेड्युलनुसार होतील.
अंडर १९ वर्ल्ड कप भारताने पाच वेळा, ऑस्ट्रेलियाने तीन वेळा तर पाकिस्तानने दोन वेळा जिंकला आहे. याशिवाय बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने एकदा विजेतेपद पटकावलं आहे.