World Cup 2023 Final: टीम इंडियाला फायनलमध्ये हरवलं, वॉर्नरने जाहीरपणे मागितली माफी; भारतीयांचे जिंकले मन
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियन टीमचा भाग असलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये त्याने माफी मागितली आहे. डेव्हिड वॉर्नरने कोणाची आणि का माफी मागितलं आहे, यामागील कारण रंजक आहे.
रविवारी 19 नोव्हेंबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वन-डे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेची फायलन लढत झाली. या लढतीमध्ये ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा पराभव करून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. वन-डे वर्ल्ड कपच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा ही ट्रॉफी जिंकली. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन टीममधील प्रत्येक खेळाडूने जल्लोष केला. पण, या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियन टीमचा भाग असलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये त्याने माफी मागितली आहे. डेव्हिड वॉर्नरने कोणाची आणि का माफी मागितलं आहे, यामागील कारण रंजक आहे.
टीम इंडियाच्या पराभवानंतर चाहते सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट शेअर करत आहेत. बहुतेक चाहते टीम इंडियाच्या संपूर्ण स्पर्धेतील कामगिरीचं कौतुक करत आहेत आणि खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. या दरम्यान, एका भारतीय चाहत्याने डेव्हिड वॉर्नरला आपल्या पोस्टमध्ये टॅग केलं. त्या चाहत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, "वॉर्नर! तू करोडो भारतीयांची मनं दुखावलीस." वॉर्नरने या पोस्टला रिप्लाय दिला आहे. वॉर्नरनं लिहिलं की, 'मला माफ करा, ही एक अतिशय चांगली मॅच होती आणि स्टेडियममधील वातावरण बघण्यासारखं होतं. तुम्हा सर्वांचे आभार.'
advertisement

वर्ल्ड कप 2023च्या फायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा सहा विकेट्सनं पराभव केला. त्यामुळे भारताचं पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. 2011पासून टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने शेवटची आयसीसी (चॅम्पियन्स ट्रॉफी) ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियाला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
advertisement
टी-20 वर्ल्ड कपवर असेल भारताची नजर
वन-डे वर्ल्ड कपमधील पराभव विसरून टीम इंडियाला आता पुढील आयसीसी टी-20 वर्ल्ड कपची तयारी सुरू करावी लागणार आहे. 2024 मध्ये आयसीसी टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट इंडिज मिळून या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहेत. 11 वर्षांनंतर ही स्पर्धा जिंकून टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवायचा आहे.
advertisement
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, युनायटेड स्टेट्स, वेस्ट इंडिज या देशांच्या क्रिकेट टीम 2024 मधील टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या आहेत. ही स्पर्धा राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवली जाणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 21, 2023 4:37 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
World Cup 2023 Final: टीम इंडियाला फायनलमध्ये हरवलं, वॉर्नरने जाहीरपणे मागितली माफी; भारतीयांचे जिंकले मन