शुभमनच्या नेतृत्वाखाली पहिला मालिका विजय
वेस्ट इंडिजने सामन्यात पुनरागमन केलं आणि भारतासमोर 121 धावांचं लक्ष्य ठेवलं. केएल राहुलने नाबाद 58 धावा करून भारताला 7 विकेट्सने विजय मिळवून दिला. कुलदीप यादवने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात तीन विकेट्स घेतल्या. कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या डावात शतकं झळकावली. अशातच कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिलाच कसोटी मालिका विजय आहे.
advertisement
WTC च्या पाईंटस टेबलमध्ये अव्वल स्थान
WTC च्या पाईंटस टेबलमध्ये टीम इंडिया तिसऱ्या स्थानी कायम असून भारताने 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियाच्या पॉईंट रेट 61.90 आहे. टीम इंडियाने मागील तिन्ही सामने जिंकले असून मोठा फायदा पाईंट्स टेबलमध्ये झाल्याचं पहायला मिळतंय. ऑस्ट्रेलिया संघाने WTC च्या पाईंटस टेबलमध्ये अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाने तीन पैकी तीन सामने जिंकले आहेत. तर श्रीलंका दुसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकेने दोन सामने खेळेल असून त्यांनी एक विजय तर एक सामना ड्रॉ राहिलाय.
सातपैकी चार कसोटी जिंकल्या
दरम्यान, शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. गिलच्या नेतृत्वाखाली भारताने सातपैकी चार कसोटी जिंकल्या आहेत. इंग्लंड दौऱ्यात गिलने संघाचे नेतृत्व केले. पाच सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली होती. आता टीम इंडियाच्या वेस्ट इंडिजविरुद्ध 2-0 ने विजय मिळवला आहे. आता साऊथ अफ्रिकाविरुद्ध शुभमनची आगामी कसोटी असेल.