एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेत आज भारत आणि ओमान आमने सामने आले होते. ओमानने प्रथम फलंदाजी करताना 135 धावा ठोकल्या होत्या.त्यामुळे भारतासमोर 136 धावांचे लक्ष्य होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना वैभव सुर्यवंशी 12 धावांवर बाद झाला होता.तर प्रियांश आर्या 10 धावांवर बाद झाला होता. त्याच्यानंतर नमन धीर आणि हर्ष दुबे भारताचा डाव सावरला होता.
advertisement
नमन धीर यावेळी 30 धावा करून बाद झाला होता.त्याच्यानंतर नेहल वढेरा मैदानात आला होता. त्याने देखील 23 धावांची खेळी केली. या दरम्यान हर्ष दुबे एका बाजूने भारताचा डाव सावरत त्यांना विजयाच्या दिशेन नेत होता. शेवटी एक धावांची गरज असताना जितेश शर्माने चौकार मारून हा सामना जिंकून दिला होता.या दरम्यान हर्ष दुबेने सर्वाधिक नाबाद 53 धावांची अर्धशतकीय खेळी करून नाबाद राहिला होता. यावेळी त्याने 7 चौकार आणि एक षटकार लगावला होता.
ओमानकडून वसिम अलीने 54 धावांची खेळी केली होती.त्याच्या जोडीला हम्मद मिर्झाने 32 धावांची खेळी केली होती.या खेळीच्या बळावर ओमानने 135 धावा केल्या होत्या. भारताकडून गुरजपनीत सिंहने आणि सुयश शर्माने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या. विजय कुमार वैशाक, हर्ष दुबे आणि नमन धीरने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
भारत अ संघ :
वैभव सूर्यवंशी,प्रियांश आर्य,नमन धीर,जितेश शर्मा (विकेटकिपर/कर्णधार),नेहल वढेरा,आशुतोष शर्मा,रमणदीप सिंग,हर्ष दुबे,गुरजपनीत सिंग,सुयश शर्मा, विजयकुमार वैशाक
ओमानचा संघ :
हम्माद मिर्झा (कर्णधार/विकेटकिपर),करण सोनावळे,वसीम अली,नारायण साईशिव,
आर्यन बिष्ट,जिकिरिया इस्लाम,सुफयान मेहमूद,मुझाहिर रझा,समय श्रीवास्तव,शफीक जान,जय ओडेद्रा
