खरं तर ऑस्ट्रेलियान अ ने सामन्याची चांगली सूरूवात केली होती. सॅम कोन्स्टासने 109 धावांची शतकीय खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने 3 गगनचुंबी षटकार आणि 10 खणखणीत चौकार लगावले होते.त्याला कॅम्पबेल 88 धावांची साथ दिली होती. त्याने 2 गगनचुंबी षटकार आणि 10 खणखणीत चौकार लगावले होते.या दोन्ही खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची चांगली सुरूवात केली होती.त्यानंतर कॅम्पेबलची विकेट पडताच ऑस्ट्रेलियाचा डाव काहीसा गडगडला.
advertisement
गुरनूर ब्रारने कॅम्पेबेलची विकेट घेतली.त्यानंतर महाराष्ट्राचे हर्ष दुबेने पहिल्यांदा सॅक कोन्स्टासला क्लिन बोल्ड केले. त्यानंतर लगेचच नथन मॅकस्विनीला अवघ्या 1 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केले.त्यानंतर खलील अहमदने ओवीवर पीकला 2 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केले. त्यानंतर कुपर कॉनोली आणि लिआम स्कॉटने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. या दरम्यान कुपर कॉनोलीला 70 धावांवर बाद केले.अशाप्रकारे भारताने 5 विकेट बाद केल्या आहेत.
दिवस अखेर ऑस्ट्रेलियाने 5 विकेट गमावून 337 धावा केल्या होत्या. यामध्ये खलील अहमद आणि गुरनुर ब्रारने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली होती. तर महाराष्ट्राच्या हर्ष दुबने 3 विकेट घेतल्या होत्या.त्यामुळे हर्ष दुबे ऑस्ट्रेलियावर भारी पडताना दिसला होता. आता टीम इंडिआ दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात किती धावात ऑल आऊट करते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ऑस्ट्रेलिया अ (प्लेइंग इलेव्हन): सॅम कोन्स्टास, कॅम्पबेल केलावे, नॅथन मॅकस्वीनी (कर्णधार) ऑलिव्हर पीक, जोश फिलिप (विकेटकिपर), कूपर कोनोली, लियाम स्कॉट, झेवियर बार्टलेट, फर्गस ओ नील, कोरी रोचिचिओली, टॉड मर्फी
भारत अ (प्लेइंग इलेव्हन): अभिमन्यू ईश्वरन,साई सुदर्शन, एन जगदीसन, श्रेयस अय्यर (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), तनुष कोटियन, हर्ष दुबे, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, गुरनूर ब्रार