खरं तर ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून भारताची सलामीवीर प्रतिका रावल होती. प्रतिका रावल हीने वर्ल्ड कप स्पर्धेत उत्कृष्ट खेळी केली होती. तिने या स्पर्धेत 308 धावा केल्या होत्या.यानंतर सेमी फायनल आधी ती दुखापतीमळे वर्ल्ड कपमधून बाहेर झाली होती.त्यामुळे तिच्या जागी शफाली वर्माला टीम इंडियात संधी मिळाली होती.
दरम्यान भारताच्या विजयानंतर प्रतिका रावल व्हिलचेअरवर मैदानात आली होती.यावेळी तिने खेळाडूंसोबत मैदानात जल्लोष केला होता. या दरम्यान तिची मुलाखतही घेतली गेली.या मुलाखतीत ती म्हणाली,
advertisement
मला काय बोलू कळत नाही, माझ्याकडे शब्दच उरले नाही आहेत. हा ध्वज माझ्यावर खांद्यावर आहे हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, असे प्रतिका रावल म्हणते. मी खूप खूश आहे की मी या संघाचा भाग आहे. मी शब्दात सांगू शकत नाही माझ्यासाठी ही किती मोठी गोष्ट आहे. मी खूप खूश आहे कारण आम्ही करून दाखवलं आहे.आमचा पहिला महिला संघ आहे जो वर्ल्डकप जिंकला आहे.त्यामुळे ही मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी खूप अवघड होतं मैदानाबाहेर बसून सामना पाहणे असे प्रतिका रावलने सांगितले.
कसा रंगला सामना
299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेचे एका बाजूने एका मागून एक विकेट पडत असताना दुसरीकडे कर्णधार लौरा व्होल्वार्डने एका बाजूने डाव सावरला होता. सामन्यात एक वेळ अशी होती की ती सामना जिंकून बाहेर पडेल असे वाटत होते. भारतीय फॅन्स तिच्या विकेटची प्रतिक्षा करत होते. आणि अखेर तो क्षण आलाच.
दिप्ती शर्माच्या बॉलवर व्होल्वार्डने मोठा शॉर्ट खेळला होता.हा बॉल इतका उंचावर होता की कॅच पकडणे खूपच अवघड होते. पण अमनज्योतने पहिल्या प्रयत्नात बॉल पकडतान उडाला, दुसऱ्यांदाही तेच झालं पण तिसऱ्यांदा तिने कॅच पडकली आणि भारतासाठी सर्वात धोकादायक ठरणारी व्होल्वार्ड 101 धावांवर आऊट झाली. ही कॅच घेताच अख्खी मॅच फिरली.आणि टीम इंडियात झटपट उरलेले विकेट काढत आफ्रिकेला 246 वर ऑलआऊट करत 52 धावांनी सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधाना आणि शेफाली वर्माने चांगली सूरूवात केली होती.दोन्ही खेळाडूंनी यावेळी 100 धावांची पार्टनरशीप केली होती. अशाप्रकारे वर्ल्ड कपमध्ये शतकीय भागिदारी करणारा ही पहिलीच जोडी ठरली होती.त्यावेळी दोन्हीही खेळाडू अर्धशतकाच्या नजीक होत्या. मात्र त्याच दरम्यान स्मृतीच्या बॅटीला कड लागली होती,त्यामुळे बॉल थेट विकेटकिपरच्या हातात गेला होता. अशाप्रकारे स्मृती मानधना 58 बॉलमध्ये 45 धावा करून बाद झाली होती.या खेळीत तिने 8 चौकार लगावले होते.
दरम्यान स्मृती बाद झाल्यानंतर जेमीमा रॉड्रीक्स मैदानात आली आहे. त्यानंतर शफाली वर्माने देखील आपलं अर्धशतक पुर्ण केलं आहे. त्यानंतर ती वेगाने शतकाच्या दिशेने चालली होती. मात्र त्याच दरम्यान 87 धावांवर ती आऊट झाली. या खेळीत तिने 7 चौकार आणि 2 षटकार लगावले होते.यानंतर शफालीच्या मागोमाग जेमीमा रॉड्रीक्स देखील 24 धावांवर बाद झाली आहे. तिच्या पाठोपाठ कर्णधार हरमनप्रीत कौर देखील 20 धावांवर बाद झाली.
त्यानंतर दिप्ती शर्माने भारताचा डाव सावरत 58 धावांची खेळी केली. आणि तिला शेवटच्या क्षणी रिचा घोषणे 34 धावांची चांगली साथ दिली.अशाप्रकारे भारताने 7 विकेट गमावून 298 धावा केल्या होत्या. साऊथ आफ्रिकेकडून आयाबोंगा खाकाने 3, नोनकुलुलोको, नदीन डी क्लर्क आणि ट्रायनने प्रत्येकी 1-1 विकेट काढली होती.
