युएसएने भारतासमोर 107 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली होती.कारण वैभव सूर्यवंशी अवघ्या 2 धावा करून बाद झाला होता.
advertisement
त्यानंतर भारत 4 ओव्हरमध्ये 21 धावा करून 1 विकेट गमावली असताना अचानक सामन्यात पावसाची एंन्ट्री झाली होती.त्यामुळे काही काळ खेळ थांबला होता.त्यानंतर आता पुन्हा सामन्याला सूरूवात झाली असून डिएलएस मेथडनुसार भारतासमोर 96 धावांचे आव्हान होते.
या आव्हानांचा पाठलाग करताना आयुष म्हात्रे 19 तर विहान मल्होत्रा 18 वर बाद झाला. त्यानंतर अभिग्यान कंडूने सर्वाधिक नाबाद 42 धावा करून भारताला 17.2 ओव्हर म्हणजेच 104 बॉलमध्ये सामना जिंकून दिला होता.
प्रथम फलंदाजी करायला उतरलेला युसएचा डाव हा 107 धावांवर ऑल आऊट झाला आहे.युसएकडून नितीश सुदीनीने सर्वाधिक 36 धावा केल्या होत्या.त्याच्या व्यतिरीक्त इतर कुणालाही मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या.
भारताकडून हेनिल पटेलने सर्वाधिक 5 विकेट तर दिपेश देवेंद्रन,आरएस अंम्ब्रिश,खिलान पटेल आणि वैभव सूर्यवंशीने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
