खरं तर आतापर्यंत भारताकडून सलामीवीर म्हणून खेळताना अभिषेक शर्माने वादळी खेळी केली आहे. त्यात आज ऑस्ट्रेलिया विरूद्ध पहिल्यांदाच अभिषेक शर्मा खेळणार होता.त्यामुळे या बलाढ्य संघाविरूद्ध खेळताना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या.मात्र तो अवघ्या 14 बॉलमध्ये 19 धावाच करू शकला. या छोटेखानी खेळीत त्याने 4 चौकार लगावले होते. यानंतर अभिषेक शर्मा नथन इलिसच्या बॉलवर टीम डेविडच्या हातात कॅच देऊन आऊट झाला होता.
advertisement
अभिषेक शर्मा आऊट झाल्यानंतर तो मैदानाबाहेर गेला.या दरम्यान तो गौतम गंभीर सोबत बसला होता.यावेळी गौतम गंभीर त्याला रागारागात बोलताना दिसला होता.त्यामुळे स्वस्तात बाद झाल्यामुळे गौतम गंभीरने अभिषेक शर्माला फटकारल्याचे बोलले जात आहे. या संदर्भातले फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या फोटोवरून तरी गौतम गंभीरने अभिषेकची शाळा घेतल्याचे बोलले जातेय.
दरम्यान अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडेल असे वाटत होते. शुभमन गिल आणि कर्णधार सुर्यकुमार यादवने भारताचा डाव सावरला होता. विशेष म्हणजे या दोघांनी नुसता डाव सारवला नव्हता तर धावगती ही कायम ठेवली होती. पण नंतर पुन्हा पावसाने खेळ थांबवला. ज्यावेळेस पाऊसामुळे खेळ थांबला तेव्हा 9.4 ओव्हरमध्ये भारताची धावसंख्या 97-1 अशी होती.यानंतर पाऊस कायम राहिला त्यामुळे नाईलाजास्तव सामना रद्द करावा लागला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर
टी 20 मालिका
२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन
