टीम इंडियाचं हे त्रिकूट दुसरं तिसरं कुणी नसून टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल आहे.हे तीनही खेळाडू पर्थच्या मैदानावर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे टीम इंडियाचा पर्थच्या मैदानावर पराभव झाला होता.आता अॅडलेडच्या मैदानावर भारताचा दुसरा वनडे सामना पार पडणार आहे.त्यामुळे पर्थवरच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी या तीनही खेळाडूंनी कसून सराव सूरू केला आहे.तब्बल अनेक तास या खेळाडूंनी सराव केला होता.त्यामुळे हा सराव पाहता हे खेळाडू पर्थवरचा निकाल बदलतील,असे वाटते.
advertisement
रोहित विराट समोर उरले दोन सामने
रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी हा दौरा खूप महत्वाचा आहे. कारण हे दोन्ही खेळाडू अनेक महिन्यांपासून मैदानात उतरले आहेत.त्यामुळे या खेळाडूंना चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. नाहीतर त्यांच्या टीम इंडियातून पत्ता कट होण्याचीही शक्यता आहे. आता य दोन्ही खेळाडूंसमोर दोनच सामने उरले आहेत. या दोन सामन्यात हे खेळाडू कशी कामगिरी करतात?हे पाहणे महत्वाचे आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
वनडे मालिका
१९ ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ
२३ ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड
२५ ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी
टी 20 मालिका
२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन