दुसऱ्या वनडेत शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे मालिकेत पुनरागमन करण्याचे लक्ष्य आहे.त्यामुळे अॅडलेडच्या मैदानावर फलंदाजांना अधिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे दोन्ही संघांत व्यवस्थित सामना पार पडेल. पण पर्थमध्ये पाऊस भारतासाठी खलनायक बनून आला होता. आता याच पावसाच सावट अॅडलेडच्या मैदानावर देखील आहे.त्यामुळे पाऊस पुन्हा खोडा घालण्याची शक्यता आहे.
हवामानाचा अंदाज काय?
advertisement
ॲडलेडवरील हवामानाबद्दल बोलायचं झालं तर संपूर्ण आठवड्यात अधूनमधून आणि लक्षणीय पाऊस पडत आहे. परिणामी,सामन्यापूर्वी खेळपट्टी सुकविण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट दिवे वापरले जात आहेत. सामन्याच्या दिवसाच्या हवामान अंदाजानुसार, दिवसा हवामान मोठ्या प्रमाणात कोरडे राहील आणि पावसाची शक्यता कमी असेल. तथापि, ढगाळ वातावरण आणि जोरदार वारे डावाच्या सुरुवातीला स्विंग खेळण्यास मदत करू शकतात. याचा अर्थ असा की पावसामुळे सामन्यात व्यत्यय येणार नाही आणि क्रिकेट चाहते संपूर्ण खेळाचा आनंद घेऊ शकतील. त्यामुळे संपूर्ण सामना व्यवस्थित पार पडण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियन संघ : मिशेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, अॅडम झांपा, बेन द्वारशुइस, मार्नस लाबुशेन, झेवियर बार्टलेट.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
वनडे मालिका
१९ ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ
२३ ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड
२५ ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी
टी 20 मालिका
२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन