मॅथ्यू शॉर्टने 74 रनची खेळी केली, यात त्याला 2 जीवनदान मिळाली. अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराजने मॅथ्यू शॉर्टचे कॅच सोडले. याशिवाय कूपर कॉनलीने 53 बॉलमध्ये नाबाद 61 रन केले. या सामन्याआधी कूपर कॉनली 7 सामन्यांच्या 4 इनिंगमध्ये फक्त 10 रन केल्या होत्या, पण भारताविरुद्ध त्याने मॅच विनिंग खेळी करत त्याचा वनडे क्रिकेटमधला सर्वाधिक स्कोअर केला आहे. कुपर कॉनलीने 7 सामन्यांच्या 4 इनिंगमध्ये 23.67 च्या सरासरीने 71 रन केले आहेत, यातल्या 61 रन भारताविरुद्धच्या सामन्यातच आल्या आहेत.
advertisement
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांनी भारताला 50 ओव्हरमध्ये 264/9 वर रोखलं. रोहित शर्माने सर्वाधिक 73 रन केले, तर श्रेयस अय्यरने 61 आणि अक्षर पटेलने 44 रनची खेळी केली, ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने 4 विकेट घेतल्या आणि झेवियर बार्टलेटला 3 विकेट मिळाल्या. मिचेल स्टार्कला 2 विकेट घेण्यात यश आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचातली तिसरी वनडे शनिवारी होणार आहे, या सामन्यात विजय मिळवून व्हाईट वॉशची नामुष्की टाळण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल.
