33 व्या ओव्हरनंतर रोहित शर्मा सुंदरकडे गेला आणि त्याने ऑस्ट्रेलियन बॅटर कुपर कॉनलीला कशी बॉलिंग करायची ते सांगितलं. रोहितने सुंदरला आक्रमक सल्ला दिला, तसंच बॉलिंगमध्ये काय बदल करायचे, ते सांगितलं. रोहित आणि सुंदर यांच्यात ही चर्चा सुरू असताना कर्णधार शुभमन गिल मागे उभा असलेला दिसत होता.
रोहितचे आक्रमक हावभाव पाहिल्यानंतर कॉमेंटेटर वरुण एरॉन यानेही यावर प्रतिक्रिया दिली. 'डावखुरा बॅटर समोर असताना ऑफ स्पिनरने बॉल बॅटरपासून दूर नेणे आणि संथ गतीने बॉलिंग करणे महत्त्वाचे आहे. बहुतेक वेळा कर्णधार येतो आणि काय करायचं ते बॉलरला सांगतो', असं वरुण एरॉन म्हणाला.
advertisement
रोहितने या सामन्यात 73 रनची खेळी केली. रोहितच्या या खेळीमुळे पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाने 264/9 पर्यंत मजल मारली. याआधी पहिल्या सामन्यात रोहित फक्त 8 रनवर आऊट झाला होता. तब्बल 7 महिन्यांनंतर रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केलं आहे. 38 वर्षांचा रोहित शर्मा 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे, पण दुसऱ्या वनडेमध्ये अर्धशतक करून रोहितने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
या सामन्यात पुन्हा एकदा टीम इंडियाची बॅटिंग गडगडली. कर्णधार गिल 9 रनवर तर विराट कोहली शून्य रनवर आऊट झाला. लागोपाठ दोन सामन्यांमध्ये विराट एकही रन न करता माघारी परतला आहे. दोन विकेट लवकर गमावल्यानंतर रोहितने श्रेयस अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी 118 रनची पार्टनरशीप केली. श्रेयस अय्यरने 77 बॉलमध्ये 61 रन केले. पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या अक्षर पटेलनेही 41 रनची महत्त्वाची खेळी केली. तर हर्षित राणाने नाबाद 24 आणि अर्शदीपने 13 रन केले, या दोघांनी नवव्या विकेटसाठी 29 बॉलमध्ये 37 रनची पार्टनरशीप केली.
