एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच पेक्षा जास्त शतके करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीतही शुभमन गिलने स्थान पटकावलंय. भारताकडून विराटने सर्वाधिक चार वेळा तर रोहित शर्माने तीन वेळा अशी कामगिरी केलीय. सचिन तेंडुलकरने दोन वेळा ५ पेक्षा जास्त शतके केली आहेत. तर राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि शिखर धवन यांनी प्रत्येकी एक वेळा वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच पेक्षा जास्त शतके झळकावली आहेत.
advertisement
IND vs AUS : शुभमन गिल सुस्साट, बांगलादेशनंतर ऑस्ट्रेलियाचीही धुलाई; झळकावलं शतक
शुभमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३५ डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याने हाशिम आमलाचा विक्रम मोडला. हाशिम आमलाने ३५ डावात १८४४ धावा केल्या होत्या. आता गिल पहिल्या तर आमला दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर बाबर आजम असून त्याने ३५ डावात १७५८ धावा केल्या होत्या. शुभमन गिलच्या नावावर ३५ डावात १९१८ धावा जमा झाल्या आहेत.
यंदाच्या वर्षात शुभमन गिलने षटकारांच्या बाबतीत भारताचा कर्णधार रोहित शर्मालासुद्धा मागे टाकलं आहे. रोहित शर्माने २०२३ मध्ये आतापर्यंत ४३ षटकार मारले आहेत. त्याला आजच्या सामन्याआधी रोहितचा विक्रम मोडण्यासाठी २ षटकार हवे होते. गिलने कॅमेरून ग्रीनने टाकलेल्या दहाव्या षटकात षटकार मारताच रोहितला मागे टाकले.