IND vs AUS : शुभमन गिल सुस्साट, बांगलादेशनंतर ऑस्ट्रेलियाचीही धुलाई; झळकावलं शतक
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
शुभमन गिलने आपल्या बॅटिंगने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई करत शतक ठोकलं आहे.
मुंबई, 24 सप्टेंबर : भारत विरुद्व ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या वनडे सिरीजमधील दुसरा सामना रविवारी खेळवला जात आहे. या सामन्यात मागील काही सामन्यांपासून जबरदस्त फॉर्मात असलेल्या शुभमन गिलने आपल्या बॅटिंगने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई करत शतक ठोकलं आहे.
आशिया कप 2023 नंतर भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची वनडे सिरीज खेळत आहे. यातील पाहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला असून दुसऱ्या सामन्यातही फलंदाजी करताना भारत ऑस्ट्रेलियावर भारी पडताना दिसत आहे. सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी भारताच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली, ऋतुराज गायकवाड चौथ्या ओव्हरला विकेट पडली. मात्र नंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यादोघांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी मैदानावर फटकेबाजी केली. प्रथम दुखापतीनंतर कमबॅक करत श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेंच्युरी केली तर त्याच्या पाठोपाठ शुभमन गिलने ही आपला फॉर्म कायम ठेवत सेंच्युरी ठोकली.
advertisement
आशिया कप 2023 मध्ये बांगलादेश विरुद्धच्या सुपर 4 सामन्यात सेंच्युरी केल्यानंतर शुभमनची वनडेतील ही लागोपाठ दुसरी सेंच्युरी झाली आहे. शुभमनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 86 बॉलमध्ये सेंच्युरी पूर्ण केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 116 होता. शुभमनची ही वनडे क्रिकेटमधील 7 वी सेंच्युरी असून तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 13 वी सेंच्युरी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2023 4:37 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : शुभमन गिल सुस्साट, बांगलादेशनंतर ऑस्ट्रेलियाचीही धुलाई; झळकावलं शतक