पहिल्या दोन विकेट सुरूवातीलाच गमावल्यानंतर रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी टीम इंडियाच्या इनिंगला आकार दिला. रोहितने 73, श्रेयसने 61 आणि अक्षर पटेलने 44 रनची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून झम्पाने 4 विकेट घेतल्या, याशिवाय झेवियर बार्टलेटला 3 आणि मिचेल स्टार्कला 2 विकेट मिळाल्या. यानंतर छोट्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने फिल्डिंगमध्ये चुका केल्या. भारतीय फिल्डर्सनी 3 कॅच सोडले, ज्यातले दोन कॅच मॅथ्यू शॉर्टचे होते, यानंतर शॉर्टने 74 रनची खेळी केली. याशिवाय कुपर कॉनलीने नाबाद 61 आणि मिचेल ओवेनने 23 बॉल 36 रनची खेळी केली. भारताकडून अर्शदीप, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदरला 2-2 आणि मोहम्मद सिराज, अक्षर पटेलला 1-1 विकेट मिळाली आहे.
advertisement
पराभवानंतर काय म्हणाला गिल?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर गिलने प्रतिक्रिया दिली आहे. 'आमच्याकडे फार जास्त रन नव्हत्या. कॅच सोडल्यानंतर या रन रोखणं सोपं नसतं. बॉल जसा जुना झाला, तसं रन करणं सोपं होतं. पहिल्या सामन्यात टॉसने महत्त्वाची भूमिका बजावली, पण या सामन्यात नाही. दोन्ही टीमनी जवळपास 50 ओव्हर बॅटिंग केली. पहिल्या 10-15 ओव्हरनंतर खेळपट्टी चांगली झाली', असं गिल म्हणाला आहे.
रोहित शर्माच्या अर्धशतकावरही गिलने प्रतिक्रिया दिली. 'बऱ्याच काळानंतर रोहितने पुनरागमन केलं आहे. सुरूवातीच्या काही ओव्हरमध्ये त्याने जी लढत दिली, ती पाहून आनंदी आहे, पण त्याने मोठी इनिंग खेळण्याची संधी आज गमावली', असं वक्तव्य गिलने केलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली तिसरी वनडे शनिवारी होणार आहे, या सामन्यात विजय मिळवून व्हाईट वॉशची नामुष्की टाळण्याचं आव्हान भारतीय टीमसमोर असेल.