बार्टलेटच्या बॉलिंगवर अक्षर पटेलने ड्राईव्ह मारला, यानंतर बॉल बाऊंड्रीच्या दिशेने जात होता. अक्षरला बॉल बाऊंड्री लाईनच्या बाहेर जाईल असं वाटत होतं, त्यामुळे त्याने पहिली रन जोरात धावली नाही, पण बॉल बाऊंड्री लाईनबाहेर जात नाहीये, हे लक्षात येताच अक्षरने त्याचा वेग वाढवला. दोन रन काढल्यानंतर अक्षर तिसरी रन काढण्यासाठी धावला, अभिषेक शर्मा त्याला यासाठी नकार देत होता, पण तरीही त्याने ऐकलं नाही. या गोंधळामध्ये अक्षर पटेलचा पाय घसरला आणि तो मैदानातच पडला. उठून पुन्हा क्रीजमध्ये जाण्यासाठी अक्षर पटेलने डाईव्हही मारली, पण तोपर्यंत विकेट कीपर जॉश इंग्लिसने बेल्स उडवल्या होत्या.
advertisement
47 रनवर अर्धी टीम माघारी
अक्षर पटेलला आऊट करण्यासाठी टीम डेव्हिडने केलेला थ्रो देखील उत्कृष्ट होता. अक्षर पटेल फक्त रन आऊटच झाला नाही, तर त्याला दुखापतही झाली. रन काढण्यासाठी अक्षर पटेल खेळपट्टीऐवजी गवतावरून पळत होता, त्यामुळे त्याचा पाय घसरला. 12 बॉलमध्ये 7 रनची खेळी करून अक्षर पॅव्हेलियनमध्ये परतला. अक्षरची विकेट गेली तेव्हा भारताचा स्कोअर 7.3 ओव्हरमध्ये 5 विकेटवर 47 रन होता.
अभिषेक शर्मा एकटा नडला
एकीकडे भारताचे बॅटर आऊट होत असताना एकट्या अभिषेक शर्माने किल्ला लढवला. अभिषेक शर्माने 37 बॉलमध्ये 68 रनची खेळी केली. अभिषेकने त्याच्या या खेळीमध्ये 8 फोर आणि 2 सिक्सचा समावेश आहे. अभिषेकने हर्षित राणासोबत 56 रनची पार्टनरशीप केली. राणाने 33 बॉलमध्ये 3 फोर आणि एक सिक्सच्या मदतीने 35 रन केले.
