ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, सूर्याचा मोठा निर्णय
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकल्यानंतर बोलताना संघाची रणनीती स्पष्ट केली. त्याने सांगितले की, 'आम्ही प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि याबद्दल आम्ही खूश आहोत.' हेच क्रिकेट आम्हाला खेळायचे आहे, असंही सूर्या म्हणाला आहे. शुभमन गिल बद्दल बोलताना सूर्या म्हणाला की, शुभमन गिलला धावा कशा करायच्या हे चांगले माहीत आहे. त्याच्यासोबत खेळताना विकेट्स दरम्यान हार्ड रन करणं आवश्यक असते. आजच्या मॅचसाठी संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि आम्ही सेम टीमसोबत खेळणार आहोत, अशी माहिती सूर्याने दिली.
advertisement
प्लेइंग इलेव्हन निवडताना गंभीरची मनमानी
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अर्शदीप सिंगला पुन्हा संधी मिळाली नाही. अर्शदीप टीम इंडियाचा स्टार बॉलर आहे. टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणारा तो बॉलर ठरलाय. तरी देखील गंभीरच्या लाडक्या खेळाडूसाठी सूर्याने अर्शदीपला बाहेर बसवलंय.
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (WK), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (WK), टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.
