Health Tips : हिवाळ्यात तळपायाला भेगा पडतात? हा सोपा उपाय करून बघा, तळपाय राहील मुलायम
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडत असल्याने अनेक त्रास होतात. त्यातीलच एक म्हणजे तळ पायाला भेगा पडणे किंवा तळपाय बेकार होणे. तळपायाला भेगा पडल्या की, चालायला त्रास होतो.
अमरावती : हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडत असल्याने अनेक त्रास होतात. त्यातीलच एक म्हणजे तळपायाला भेगा पडणे किंवा तळपाय बेकार होणे. तळपायाला भेगा पडल्या की, चालायला त्रास होतो. अशावेळी मग अनेक महागडे प्रॉडक्ट आणून त्यावर उपाय केले जातात. काहीवेळा घरगुती त्रासदायक उपाय देखील केले जातात. पण, अगदी घरगुती सोपा उपाय करून तळपाय मुलायम आणि निरोगी राहू शकतात. याबाबत माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
हिवाळ्यात तळपायाची काळजी कशी घ्यावी?
याबाबत त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांच्याशी लोकल 18 ने चर्चा केली असता त्या सांगतात की, हिवाळ्यात संपूर्ण शरीराची त्वचा कोरडी पडते. त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. तळपायाला जर वायजळ असेल तर त्याची सुद्धा योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे पाय 15 मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवावे त्यामुळे पाय नरम राहतील. पाण्यात काहीच टाकायची गरज नाही साध्या पाण्यात पाय बुडवून ठेवावे. त्यानंतर साध्या ब्रशने पाय घासून घ्यायचे.
advertisement
पायासाठी कोणते मॉइश्चरायझर वापरावे?
त्यानंतर पायासाठी जे युरिया युक्त मॉइश्चरायझर येतात ते लावावे. रात्री झोपताना हे मॉइश्चरायझर जर तुम्ही वापरले तर तुमचे पाय अगदी नरम राहतील. त्याचबरोबर पायावर जास्त मळ साचू द्यायचा नाही. त्यामुळे अनेक किटाणू तयार होतात आणि पायाला खाज सुटते. खाजवल्यास फोड तयार होतात. त्यामुळे पायाची योग्य निगा राखणे महत्त्वाचे आहे. तुमच्या पायाला वायजळ असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर ट्रीटमेंट घेऊ शकता. घरगुती उपाय जास्त करत बसायचे नाही. खूप जास्त वायजळ असल्यास डॉक्टरांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Oct 31, 2025 6:54 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : हिवाळ्यात तळपायाला भेगा पडतात? हा सोपा उपाय करून बघा, तळपाय राहील मुलायम









