शुभमन गिलच्या हेल्मेटला बॉल लागला
पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर हेझलवूडने धोकादायक बाउन्सर टाकला जो शुभमन गिलच्या हेल्मेटला लागला. त्यामुळे सामना काहीवेळ थांबवावा लागला. मैदानात डॉक्टर आले अन् त्यांनी शुभमन गिलला चेक केलं. त्यानंतर काही वेळाने पुन्हा खेळ सुरू केला. हेझलवूडने पहिल्याच ओव्हरमध्ये कहर केल्याने सामना रंगतदार स्थितीत आला आहे.
advertisement
मिशेल मार्शच्या हाती कॅचआऊट
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शुभमन गिलची फलंदाजी निराशाजनक ठरली आहे. पहिल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याला धावा काढण्यात अडचण आली आणि आता तो दुसऱ्या टी- ट्वेंटी मध्येही परतला आहे, त्याने त्याची विकेटही गमावली. 10 बॉल खेळल्यानंतर तो फक्त 5 धावांवर हेडलवूडच्या बॉलवर मिशेल मार्शच्या हाती कॅचआऊट झाला.
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (WK), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (WK), टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.
