या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर सुरूवातीपासूनच टीम इंडियाला एकामागोमाग एक धक्के बसायला सुरूवात झाली. शुभमन गिल 5 रनवर, संजू सॅमसन 2 रनवर, सूर्यकुमार यादव 1 रनवर, तिलक वर्मा शून्य आणि अक्षर पटेल 7 रनवर आऊट झाले. 49 रनवरच भारताने 5 विकेट गमावल्या होत्या, यानंतर अभिषेक आणि हर्षित राणा यांच्यात 56 रनची पार्टनरशीप झाली. हर्षित राणा 35 रनवर आऊट झाल्यानंतर पुन्हा भारताची बॅटिंग गडगडली. शिवम दुबे 4 रनवर, कुलदीप यादव शून्य आणि जसप्रीत बुमराहही शून्य रनवर आऊट झाले. या सामन्यात भारतीय टीममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
advertisement
भारतीय टीम
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
