मागच्या महिन्यात आशिया कपमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार जिंकणारा अभिषेक मेलबर्नमध्ये मोठी खेळी करण्यासाठी मैदानात उतरेल. सीरिजच्या पहिल्या सामन्यात भारताने डावखुरा फास्ट बॉलर अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवलं होतं. अर्शदीप सिंग टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर आहे, तरीही त्याला खेळण्याची संधी मिळत नाहीये. दुसऱ्या टी-20 सामन्यातही अर्शदीप सिंगला बेंचवरच बसावं लागण्याची शक्यता आहे.
advertisement
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली दुसरी टी-20 दुपारी 1.45 वाजता सुरू होणार आहे. स्टार स्पोर्ट्स आणि जियो हॉटस्टारवर या मॅचचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
मेलबर्नमध्ये टीम इंडियाचं रेकॉर्ड
सर्वाधिक स्कोअर : 6 नोव्हेंबर 2022, झिम्बाब्वेविरुद्ध 20 ओव्हरमध्ये 186/5
सगळ्यात कमी स्कोअर : 1 फेब्रुवारी, 2008 ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17.3 ओव्हरमध्ये 74/10
सगळ्यात मोठा विजय (रनच्या अंतराने) : भारताने 6 नोव्हेंबर 2022 ला झिम्बाब्वेचा 71 रनने पराभव केला.
सर्वाधिक रन : विराट कोहली 5 सामन्यांमध्ये 198 रन
सर्वाधिक स्कोअर : विराट कोहली 23 ऑक्टोबर 2022, पाकिस्तानविरुद्ध 53 बॉलमध्ये नाबाद 82
सर्वोत्तम बॅटिंग सरासरी : विराट कोहली 99.00
सर्वोत्तम स्ट्राईक रेट (कमीत कमी 25 बॉल) : सूर्यकुमार यादव (217.14)
सर्वाधिक अर्धशतक : विराट कोहली, 2 अर्धशतक
सर्वाधिक शून्य : श्रीसंत आणि सेहवाग 1-1 वेळा शून्यवर आऊट
सर्वाधिक सिक्स : विराट कोहली, 5 सिक्स
सर्वाधिक विकेट : हार्दिक पांड्या, 3 मॅचमध्ये 6 विकेट
सर्वाधिक आऊट : एमएस धोनी 3 सामन्यात 6 विकेट, 3 कॅच आणि 3 स्टम्पिंग
सर्वाधिक कॅच : भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव 3-3 कॅच
सर्वोत्तम पार्टनरशीप : 23 ऑक्टोबर 2022 पाकिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्या विराट कोहली, पाचव्या विकेटसाठी 113 रन
सर्वाधिक मॅच : रोहित शर्मा 6 टी-20 आंतरराष्ट्रीय
कर्णधार म्हणून सर्वाधिक मॅच : एमएस धोनी, 3 टी-20 आंतरराष्ट्रीय
