खरं तर दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी मैदानात कसून सराव केला होता. यावेळी प्रॅक्टीसला रोहित शर्मा पुन्हा एकदा अॅडलेड ओव्हल येथे नेट्सवर पोहोचणारा पहिला खेळाडू होता.नेहमीप्रमाणे, त्याने जोरदार सराव केला, थ्रोडाऊन घेतले आणि वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा सामना केला.यावेळी प्रॅक्टीसच्या संपूर्ण सत्रात त्याचा मूड आणि देहबोली वेगळी दिसत होती, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली.
advertisement
मिडिया रिपोर्टनुसार,नेट्सनंतर टीम हॉटेलमध्ये परतताना रोहित त्याच्या नेहमीच्या उत्साही स्वभावात दिसला नाही.तो सहसा मीडिया आणि चाहत्यांशी हसतमुखाने संवाद साधतो, परंतु यावेळी त्याने शांतपणे मैदान सोडले होते. यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि निवड समिती सदस्य शिव सुंदर दास हे तरुण फलंदाज यशस्वी जयस्वाल यांच्याशी दीर्घ चर्चा करताना दिसले.या चौघांमध्ये बराच काळ चर्चा सूरू होती.त्यामुळे दुसऱ्या वनडेतून रोहित शर्मावा वगळले जाईल अशी चर्चा आहे.
खरं तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी यशस्वी जयस्वालला संघात स्थान देण्यात आलं आहे. पण रोहित शर्मामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नव्हतं. पण पर्थमधील रोहित शर्माच्या फ्लॉप कामगिरीनंतर टीम मॅनेजमेंट यशस्वी जयस्वाललाही संधी देण्याची तयारी करते आहे. अजून तरी जयस्वालला दुसऱ्या वनडेत खेळवण्याची कुठलीच चर्चा नाही आहे.पण सराव सामन्यातील त्या व्हिडिओत कदाचित जयस्वालला संधी मिळेल असे बोलले जात आहे.
ऑस्ट्रेलियन संघ : मिशेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, अॅडम झांपा, बेन द्वारशुइस, मार्नस लाबुशेन, झेवियर बार्टलेट.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
वनडे मालिका
१९ ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ
२३ ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड
२५ ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी
टी 20 मालिका
२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन