ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना गमावल्यानंतर भारताने या सामन्यात टीममध्ये 3 बदल केले. हर्षित राणा, संजू सॅमसन आणि कुलदीप यादव यांना बाहेर करण्यात आलं. तर या तिघांऐवजी अर्शदीप सिंग, जितेश शर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी देण्यात आली. अर्शदीप सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी त्यांना मिळालेल्या या संधीचं सोनं केलं. सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव यालाही आजचं टीम कॉम्बिनेशन योग्य असल्याची प्रतिक्रिया द्यावी लागली.
advertisement
दोन खेळाडूंचा पत्ता कट?
भारतात होणारा टी-20 वर्ल्ड कप आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. 6 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान टी-20 वर्ल्ड कप होण्याची शक्यता आहे, पण त्याआधीच सूर्याने केलेल्या या वक्तव्यामुळे भारतीय टीममधल्या दोन खेळाडूंचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. आशिया कपवेळी दुखापत झालेला हार्दिक पांड्या या सीरिजमध्ये खेळू शकला नाही, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये हार्दिकचं पुनरामगन होण्याची शक्यता आहे. तसंच हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कप खेळेल, हेदेखील निश्चित आहे.
हार्दिक पांड्याचं कमबॅक झाल्यानंतर रिंकू सिंगचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. आशिया कपमध्येही रिंकू सिंगला हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर फायनलमध्ये संधी मिळाली होती. आता ऑस्ट्रेलियातही रिंकू सिंगला बेंचवरच बसावं लागत आहे.
गिलसाठी संजूचा बळी?
आशिया कपआधी संजू सॅमसन हा टी-20 फॉरमॅटमधला टीमचा ओपनर होता, पण गिलचं टीममध्ये कमबॅक झाल्यानंतर संजूला खालच्या क्रमांकावर बॅटिंग करावी लागली, पण यात त्याला फार यश आलं नाही. अखेर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मधून संजू सॅमसनला डच्चू देण्यात आला, पण शुभमन गिलही फॉर्मसाठी संघर्ष करत आहे. आशिया कपपासून गिलने 10 इनिंगमध्ये 23 ची सरासरी आणि 146 च्या स्ट्राईक रेटने फक्त 184 रन केले आहेत, यात त्याला एकही अर्धशतक करता आलेलं नाही. तसंच त्याचा सर्वोत्तम स्कोअरही फक्त 47 रन आहे.
