TRENDING:

IND vs AUS : गंभीरने टीम सिलेक्ट केली, पण सूर्या मैदानात स्ट्रॅटेजीच विसरला, टीम इंडियाचा मोठा ब्लंडर

Last Updated:

भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 186 रन केल्या आहेत. टीम डेव्हिडने 38 बॉलमध्ये 74 आणि मार्कस स्टॉयनिसने 39 बॉलमध्ये 64 रनची खेळी केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
होबार्ट : भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 186 रन केल्या आहेत. टीम डेव्हिडने 38 बॉलमध्ये 74 आणि मार्कस स्टॉयनिसने 39 बॉलमध्ये 64 रनची खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंगला 3 विकेट मिळाल्या तर वरुण चक्रवर्तीने 2 आणि शिवम दुबेने एक विकेट घेतली. या सामन्यात टीम मॅनेजमेंटने मागच्या सामन्यातील चूक सुधारून अर्शदीप सिंगला संधी दिली, ज्याचा फायदा टीमला पहिल्याच ओव्हरमध्ये झाला. अर्शदीपने मॅचच्या चौथ्या बॉललाच ट्रेविस हेडला आऊट केलं. मागच्या सामन्यात अर्शदीपला न खेळवण्याची चूक भारताने सुधारली असली, तरी या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने मैदानात आणखी मोठी घोडचूक केली.
गंभीरने टीम सिलेक्ट केली, पण सूर्या मैदानात स्ट्रॅटेजीच विसरला, टीम इंडियाचा मोठा ब्लंडर
गंभीरने टीम सिलेक्ट केली, पण सूर्या मैदानात स्ट्रॅटेजीच विसरला, टीम इंडियाचा मोठा ब्लंडर
advertisement

या सामन्यात टीम इंडिया अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती हे स्पेशलिस्ट बॉलर तसंच अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे या तीन ऑलराऊंडरसह मैदानात उतरली होती, पण शिवम दुबेवर ऑस्ट्रेलियान बॅटरनी आक्रमण केलं, तरीही सूर्याने दुबेला 3 ओव्हर दिल्या. या 3 ओव्हरमध्ये दुबेने तब्बल 43 रन दिल्या, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठ्या स्कोअरपर्यंत मजल मारता आली.

advertisement

सुंदरला बॉलिंग नाही

शिवम दुबेला सूर्याने मॅचच्या आठव्या ओव्हरमध्ये पहिल्यांदा बॉलिंगला उतरवलं, यानंतर त्याच्या या ओव्हरला 15 रन आले. त्यानंतर दुबेला 13 वी ओव्हरही देण्यात आली, ज्यात ऑस्ट्रेलियाने 15 रन काढले. पहिल्या दोन ओव्हरमध्ये 28 रन आल्यानंतरही कर्णधाराने दुबेला 17 वी ओव्हर दिली, ज्यात पुन्हा 13 रन आले. मुख्य म्हणजे टीममध्ये वॉशिंग्टन सुंदर हा ऑलराऊंडर असतानाही त्याला एकही ओव्हर बॉलिंग देण्यात आली नाही, त्याऐवजी अभिषेक शर्माने एक ओव्हर टाकली, ज्यात 13 रन आले. शिवम दुबे आणि अभिषेक शर्मा यांच्या 4 ओव्हरमध्येच भारताने 56 रन दिल्या, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला 186 रनपर्यंत मजल मारता आली.

advertisement

या सामन्यात टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. संजू सॅमसनऐवजी जितेश शर्मा, हर्षित राणाऐवजी अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादवऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली.

भारताची प्लेइंग इलेव्हन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Afghan Apples: ‘पहलगाम’नंतर अफगाणी सफरचंद समुद्रमार्गे भारतात, पुण्यात दर किती?
सर्व पहा

शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जितेश शर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : गंभीरने टीम सिलेक्ट केली, पण सूर्या मैदानात स्ट्रॅटेजीच विसरला, टीम इंडियाचा मोठा ब्लंडर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल