ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या विजयासोबतच भारताने टी-20 सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 186 रन केल्या. टीम डेव्हिडने 38 बॉलमध्ये 74 आणि मार्कस स्टॉयनिसने 39 बॉलमध्ये 64 रनची खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, याशिवाय वरुण चक्रवर्तीला 2 आणि शिवम दुबेला एक विकेट मिळाली.
advertisement
गंभीरने बाहेर ठेवलं, त्यांनीच जिंकवलं
दुसऱ्या टी-20 सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताने या सामन्यात टीममध्ये 3 बदल केले. हर्षित राणा, संजू सॅमसन आणि कुलदीप यादव यांना बाहेर करण्यात आलं. त्यांच्याऐवजी अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर आणि जितेश शर्मा यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. अर्शदीप सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघं टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. अर्शदीपने मॅचच्या चौथ्या बॉललाच विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाला रोखून धरलं. अर्शदीपने 4 ओव्हरमध्ये 35 रन देऊन 3 विकेट घेतल्या. यानंतर भारताने 111/4 विकेट गमावल्या होत्या, पण मॅच फसलेली असताना वॉशिंग्टन सुंदरने ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवर आक्रमण करून भारताचा विजय निश्चित केला. अर्शदीप सिंगला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली चौथी टी-20 मॅच गुरूवार 6 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारी टीम सीरिजमध्ये पराभूत होऊ शकणार नाही. दोन्ही टीममधला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आणि तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. 5 टी-20 मॅचची ही सीरिज आता 1-1 ने बरोबरीमध्ये आहे.
