India vs Australia 3rd T20I : होबार्टच्या मैदानावर पार पडलेल्या तिसऱ्या टेस्ट सामन्यात आज भारतीय संघाने 5 विकेट राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.या विजयासह भारताने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली होती. भारताच्या या विजयात अर्शदिप सिंह आणि वॉशिंग्टन सुंदरने मोलाची भूमिका बजावली होती. दरम्यान अर्शदिप सिंहला या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळताच अर्शदिप सिंहने चाहत्यांना ॲटीट्यूड दाखवला आहे.त्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
advertisement
खरं तर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट गमावून 186 धावा केल्या आहेत. या दरम्यान भारताकडून सर्वाधिक अर्शदिप सिंहने 3, वरूण चक्रवर्तीने 2 आणि शिवम दुबने 1 विकेट घेतली होती. अर्शदिपने या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करून 3 विकेट काढल्याबद्दल सामन्यानंतर त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्कार मिळताच अर्शदिप सिहने ॲटीट्यूड दाखवला आहे.
त्याचं झालं असं सामन्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होते. यावेळी ड्रेसिंग रुमच्या दिशेने जाताना असलेल्या खेळाडूंना पाहून अनेकांनी खेळाडूंकडे हायफाय किंवा हात मिळवण्यासाठी हात पुढे केला होता. पण अर्शदिपने आपलं शरीर वळवून तो थेट तिथून गेला. बाकी इतर खेळाडू ही त्याचवेळी तिथून गेले पण त्यांनी कोणतेच हावभाव न दाखवता थेट निघून जाणे पसंत केले होते. पण आता अर्शदिप ज्या प्रमाणे वागला त्यावरून चाहते चांगलेच संतापले आहेत.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 186 रन केल्या. टीम डेव्हिडने 38 बॉलमध्ये 74 आणि मार्कस स्टॉयनिसने 39 बॉलमध्ये 64 रनची खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, याशिवाय वरुण चक्रवर्तीला 2 आणि शिवम दुबेला एक विकेट मिळाली.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताची चांगली सुरूवात झाली नव्हती. पण शेवट्च्या क्षणी वॉशिंग्टन सुंदरने 49 धावांची मॅच विनिंग खेळी केली. यावेळी त्याला जितेश शर्माने 22 धावा करून चांगली साथ दिली होती. अशाप्रकारे भारताने 5 विकेट्स राखून हा सामना जिंकला. या विजयासह भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
