चौथ्या टी-20 आधी भारतीय टीममध्येही बदल केले गेले आहेत. कुलदीप यादवला भारतामध्ये परत पाठवण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजची तयारी करण्यासाठी कुलदीपला दक्षिण आफ्रिका ए विरुद्धची अनऑफिशियल टेस्ट खेळण्यासाठी भारतात पाठवण्यात आलं आहे. तर पहिल्या तीन सामन्यांना मुकलेला ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी फिट झाला आहे, त्यामुळे नितीश रेड्डीला खेळवायचं असेल तर कुणाला बाहेर केलं जाणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
advertisement
भारतीय टीम
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, जितेश शर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा
ऑस्ट्रेलियाची टीम
मिचेल मार्श (कर्णधार), जॉश इंग्लिस, मॅथ्यू शॉर्ट, टीम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, झेवियर बार्टलेट, बेन ड्वारशुईस, नॅथन एलिस, मॅथ्यू कुन्हेमन, जॉश फिलीप, तनवीर संघा, माहली बियर्डमन
