खरं तर शुभमन गिलला टीम इंडियात बढती मिळाली आहे.टेस्ट कॅप्टन्सीनंतर आता त्याला वनडेचा कर्णधार बनवण्यात आलं आहे.त्यामुळे वनडेचा कर्णधार बनताच शुभमन गिलसमोर मोठं चॅलेंज निर्माण झालं आहे. कारण इकडे शुभमन गिलच्या कर्णधार पदाची घोषणा होताच तिकडे 12 हजार 300 किलोमीटर दूर ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने वादळी शतक ठोकलं आहे.
ऑस्ट्रेलिया भारता विरूद्ध खेळण्याआधी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे.या दौऱ्यात त्याने तीन वनडे आणि तीन टी20 सामने खेळले आहेत. मालिकेतला शेवटचा टी20 सामना आज ऑस्ट्रेलियाने खेळला. हा सामना न्यूझीलंडच्या बे ओव्हल मैदानात खेळवण्यात आला होता. हे मैदान भारतापासून तब्बल 12 हजार 300 किलोमीटर दूर आहे, त्यामुळे याच मैदानावरून गिलला वॉर्निंग आली आहे.
advertisement
ऑस्ट्रेलियाने शेवटच्या टी20 सामन्यात न्युझीलंडचा पराभव केला आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट गमावून 156 धावा ठोकल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने नाबाद शतकीय खेळी केली होती. मिचेल मार्शने 50 बॉलमध्ये 103 धावांची शतकीय खेळी केली होती.या शतकीय खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 3 विकेटने सामना जिंकला होता. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 2-0 ने मालिका खिशात घातली आहे.
दरम्यान मिचेल मार्शने ठोकलेले हे शतकच शुभमन गिलसमोर मोठं चॅलेंज आहे.त्यामुळे या चॅलेंजला आता शुभमन गिल कसे प्रत्युत्तर देतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
वनडे मालिका
१९ ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ
२३ ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड
२५ ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी
टी 20 मालिका
२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन