काय म्हणाले गावसकर?
'विराटने जे केलं, त्यात जास्त काही पाहू नका. कारण विराट जेव्हा खेळायला आला, तेव्हा त्याचं ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं, तेव्हा उभं राहून टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या मैदानात भारताचे प्रेक्षक तर होतेच, पण ऑस्ट्रेलियाचे प्रेक्षक जास्त होते. त्यांनी मनापासून विराटचं स्वागत केलं, त्याला प्रतिक्रिया म्हणून आऊट झाल्यानंतर विराटने तसं केलं', असं गावसकर म्हणाले आहेत.
advertisement
'खेळाडू जिथून येतात तिथे सदस्य बसतात. प्रेक्षक खाली असतात, पण वर सदस्य असतात. प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेले, टेस्ट क्रिकेट खेळलेले खेळाडू सदस्य असतात, त्यांच्यासाठी विराटने ती प्रतिक्रिया दिली. यात तुम्ही जास्त काही पाहू नका. मैदानात जातानाही आणि आऊट झाल्यानंतर परत जातानाही प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, यावर त्याने फक्त प्रतिक्रिया दिली', असं वक्तव्य गावसकरांनी केलं आहे.
'सिडनीमध्ये कोहली शंभर टक्के खेळेल. कोहली सोडून देणारा खेळाडू नाही. दोनदा शून्य वर आऊट झाल्यानंतर तो निघून जाईल, असं तुम्हाला वाटतंय? अजिबात नाही तो सर्वोच्च कामगिरी करून जाईल. सिडनी आहे, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरिज आहे, बऱ्याच वनडे आहेत. विराट-रोहितसाठी 2027 आहे', असा विश्वासही गावसकरांनी व्यक्त केला.
ऑस्ट्रेलियात विराट-रोहितचा सन्मान
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा असेल, त्यामुळे सर्वच स्टेडियमवर त्यांचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे. विराट आणि रोहित बॅटिंगला आले की प्रेक्षक टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करतात, तसंच आऊट झाल्यानंतर स्टेडियममध्ये जातानाही प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवतात. प्रेक्षकांचं हे अभिवादन स्वीकारण्यासाठी विराट कोहलीने त्यांच्याकडे पाहून हात दाखवले.